Download App

Maratha Andolan : ‘मी तुमच्यासोबत, काळजी करू नका’; राज ठाकरेंचा फोनवरून जरांगेंना शब्द

Maratha Andolan : जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर (Maratha Andolan) झालेल्या लाठीमाराचे पडसाद आजही उमटत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वात सहाव्या दिवशीही उपोषण सुरू आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. मी तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका. या लढाईत आम्ही तुमच्याबरोबर असल्याचा शब्द राज ठाकरे यांनी दिला.

काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी जरांगे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी जरांगे यांची भेट घेतली. तसेच राज ठाकरे आणि जरांगे यांचा फोनवर संवाद घडवून आणला. त्यानंतर राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांच्याबरोबर फोनद्वारे चर्चा केली. 

मनसेचं ठरलं! पवारांच्या बारामतीत ‘राज’गर्जना; मोरेंनी सांगितलं प्लॅनिंग

राज ठाकरे यांनी लाठीमाराच्या घटनेची (Maratha Andolan) माहिती घेतली. जरांगे पाटील यांनी घटनेची माहिती देत आम्हाला लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केल्याचे सांगितले. त्यावर राज ठाकरे यांनी त्यांना तुम्ही काळजी करू नका. या आंदोलनातआ आम्हीही तुमच्यासोबत आहोत. मनसे तुमच्या पाठिशी आहे असा शब्द राज ठाकरे यांनी जरांगे पाटील यांनी दिला.

शांततेच्या मार्गाने चालणाऱ्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी (Maratha Andolan) लाठीमार, गोळीबार करणं कोणत्या कायद्यात बसतं?. लाखोंचे मोर्चे काढून मराठा समाजाने जगाला आदर्श घालून दिला. लाखोंच्या मोर्चात हिंसक वळण लागलं नाही. मग, इथं असं काय घडलं होतं? असा सवाल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केला. पोलीस सांगतात आमच्यावर हल्ले झाले. आंदोलक काय दगड, धोंडे घेऊन बसले का?, असाही सवाल नांदगावकर यांनी केला.

Eknath Khadse : राजकारणातली मोठी चूक कोणती? नाथाभाऊंनी बेधडक सांगितलं

इथे सरकारचं चुकलंच

दरम्यान, या घटनेवर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत प्रतिक्रिया (Maratha Andolan) व्यक्त केली होती. राज ठाकरे यांनी लाठीमाराचा निषेध व्यक्त केला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरू असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी याचा निषेध नोंदवतो.

या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेऊन आहे आणि या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो. मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी (Maratha Andolan) जी आंदोलनं केली त्या आंदोलनांचा इतिहास बघितला तर मी माझ्या अनेक सभांमध्ये म्हणलं तसं की ती आंदोलनं, मोर्चे ह्याचा जगाने आदर्श घ्यावा इतकी शांततेत आणि समंजसपणे झाली होती. अशी पार्श्वभूमी असताना जालन्यात काल काय असं घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? पोलिसांच्या अहवालात माहिती येईलच, पण मी खात्रीने सांगतो की पूर्व इतिहास पाहता आंदोलकांनी कोणतच चुकीचं पाऊल नसतं टाकलं. त्यामुळे येथे सरकारचं चुकलं हे निश्चित, असे राज ठाकरे म्हणाले होते.

Tags

follow us