Chatrapati Sambhaji Nagar : शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Shshma Andhare) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्य त्यांना चांगलेच त्रासदायक ठरताना दिसत आहे. या वक्तव्याविरोधात ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. सुषमा अंधारे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सांगितले.
तानाजी सावंत म्हणाले, सत्तापरिवर्तनाचं 2019 पासूनचं प्लॅनिंग… पहिली बंडखोरी कोणाची?
शिरसाट यांचे वक्तव्य फक्त गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि क्रिमिनल लॉ मध्ये बसणारे आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार देणार असून कायदेशीर प्रक्रियेत कोणता गुन्हा दाखल होतो हे देखील सांगणार आहोत, असे दानवे म्हणाले.
Nilesh Rane On Election: 2024 ची मॅच मला जिंकायची, निलेश राणेंचा विश्वास
राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासू महिलांचा अपमान करण्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. मंत्री आमदार महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्ये करत असतात. भाजप सरकार आणि मुख्यमंत्री शिंदे महिलांचा अवमान करणाऱ्या मंत्री आणि आमदारांना कसं संरक्षण देतात हेच यातून समोर येत असल्याचे दानवे म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनीही शिरसाट यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे एका व्यक्तीचे नाव नाही तर प्रवृत्तीचे नाव आहे. सुषमाताई अंधारे (Sushma Andhare) या प्रत्येकाशी बोलत असताना भाऊ दादा अशी संबोधने लावतात कारण त्या एका चांगल्या घरातून आणि चांगल्या संस्कारातून आलेल्या आहेत.
Maharashtra Politics: महिलांबद्दल गलिच्छ भाषा संजय शिरसाटांना भोवणार? रूपाली ठोंबरेचा इशारा
त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या कुटुंबाचे आणि त्यांच्या पक्ष नेतृत्वाचे अत्यंत सभ्य आणि सुसंस्कृत संस्कार दिसतात. ज्याची सध्या पातळी घसरलेल्या राजकारणात वाणवा आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी केले.