Download App

गावकऱ्यांकडून कौतुक अन् सावंतांचा विजयाचा निर्धार; प्रचारात विकासाचाच मुद्दा..

तानाजी सावंत यांनी भूम तालुक्यातील सुकटा, वाकवड, हाडोंग्री गावांमध्ये सभेच्या माध्यमातून पंचक्रोशीतील नागरिकांशी संवाद साधला.

Tanaji Sawant Election Campaign : परंडा विधानसभा मतदारसंघ शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ.तानाजी सावंत यांनी भूम तालुक्यातील सुकटा, वाकवड, हाडोंग्री गावामध्ये जाऊन सभेच्या माध्यमातून पंचक्रोशीतील नागरिकांशी संवाद साधला. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असणाऱ्या या भागाच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षात सातत्याने प्रयत्न केलेत. त्याचाच परिणाम म्हणून आज सुधारणा झालेल्या दिसत आहेत. संवाद दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी आजवर झालेल्या विकासकामांचे कौतुक केले व सावंतांच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला.

तानाजी सावंत सध्या मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. गावागावात जाऊन नागरिकांच्या भेटी घेत आहेत. गावांतील चौक सभांच्या माध्यमातून विकासाचे मु्द्दे मांडत आहेत. या अंतर्गत कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीराज सावंत यांनी परंडा आणि भूम तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार दौरा केला. या दौऱ्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

वडिलांसाठी मुलगाही मैदानात

गावागावात घेण्यात आलेल्या बैठकीत तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत यांनी तानाजी सावंतां यांनी केलेल्या विकासकामांची सविस्तर माहिती दिली. शहरी आणि ग्रामीण भागातील विकासकामांसाठी तानाजी सावंत यांनी दिलेला निधी, रोजगाराच्या संधी आणि सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या कल्याणकारी योजनांबद्दल उपस्थितांना माहिती दिली.

साखर कारखाना, दूध संघ अन् पाणी.. तानाजी सावंतांनी भविष्यातील प्रोजेक्टच मांडला

गिरीराज सावंत यांनी स्पष्ट केले की डॉ. तानाजी सावंत साहेबांनी परंडा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न उराशी बाळगून मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लावली आहेत. त्यांनी २०२२ मध्ये मंत्रिपद स्वीकारल्यानंतर या मतदारसंघात दोन हजार कोटी रुपयांचा निधी आणला आहे. विशेष म्हणजे निधीचे वाटप करताना त्यांनी विरोधकांच्या गावांनादेखील मदत केली. दुजाभाव न करता मतदारसंघातील सर्व गावांना विकासासाठी निधी दिला.

सर्वसामान्यांसाठी प्रा. सावंत साहेबांनी सुरु केलेला आशिया खंडातील पहिला फिरता दवाखाना एक आदर्श उपक्रम ठरला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाच्या आरोग्य, शिक्षण, आणि रोजगाराच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत.

परंडा मतदारसंघाच्या विकासाला गती देण्यासाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून प्रा. डॉ. तानाजी सावंत साहेबांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन गिरीराज सावंत यांनी केले. या दौऱ्यात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी उद्योजक चंद्रकांत सरडे, प्रा. शरद जाधव, संतोष बाबर, शरद जाधव, आणि शुभम मोहिते उपस्थित होते.

तानाजी सावंतांचा संवाद दौरा; प्रचारातून दिला विकासाचा शब्द

follow us