भाजप नेते प्रसाद लाड यांनी आज अंतरवालीमध्ये मराठा (Maratha) आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा रणशिंग फुंकल्यानंतर लाड यांनी ही भेट घेतली. दरम्यान, 30 मे रोजी होणारं आंदोल जरांगे पाटील यांनी पुढलं ढकललं आहे. सरकारला जरा वेळ देऊन, लोकांनाही पावसाच्या तोंडावर काम आहेत असं जरांगे म्हणाले आहेत.
मनोज जरांगे म्हणाले, सातारा संस्थान गॅझिटरचा जीआर सरकारने काढला आहे. त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र द्यावेत. त्यासाठी आदेशाची गरज आहे. गॅझिटर जीआरनुसार कुणबी प्रमाणापत्र द्यावे. कुणबी प्रमाणपत्र निघणाऱ्या वैधता प्रमाणपत्र तातडीने द्यावेत, अशी मागणी आहे. राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी गॅझिटरप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र देत आहे, असे सांगावे आहे. सातारा गॅझिटिअरचा जीआर मंगळवारी सरकार काढू शकतं. गुन्ह्यांची माहिती, सारथी व महामंडळाच्या बंद योजनेबाबत चर्चा झाली आहे. शिष्यवृत्तीच्या पैशाबाबत चर्चा झाली आहे.
शिंदे समितीची मुदतवाढ एक वर्षाची मुदतवाढ देऊन नोंदी शोधल्या पाहिजे आहे. उपसमितीने पुढच्या काळात चांगले काम करावे, अशी भूमिका लाड यांच्यासमोर मांडली आहे आहे. नवीन मागणी केली आहे. मराठा आणि कुणबी मंत्रालय स्वतंत्र करावे आहे. स्वतंत्र यंत्रणा उभे राहिले. मंत्री व अधिकारी उपलब्ध नसेल, तो त्रास कमी होईल.
चार वर्षांत लोकसंख्या 60 टक्के झालीच कशी? मनोज जरांगेंनी भुजबळांचं नाव घेत मुळावरच घाव घातला
मागण्या मान्य झाल्या नाही तर मी उपोषणाला थांबत नसतो. माझ्या समाजातील लेकराचं जूनमध्ये वाटोळं होणार आहे. त्यांचे म्हणणं उपोषणाला बसू नको, होऊ दे वाटोळ मी नाही बसणार उपोषणाला. हे खोटं आहे का 50 ते 60 लाख मुलं प्रवेश घेणार आहेत. वैधता प्रमाणपत्रावरून त्यांचे वाटोळं होणार आहे. लाडपण माझ्याबरोबर उपोषणाला बसावे लागणार आहे.
गावा-गावातील बैठका महाराष्ट्रातील थांबणार आहे. कारण समाजातील संभ्रम जाईल. माझे आणि माझे वाक्य वेगळं होईल. लाड यांना वाटेल आमचा सन्मान केला आहे. मला पण उद्या वाटणार आहे, लाड यांच्यामुळे आंदोलन मोडीत निघाले आहे. पाच-सहा दिवसात आंदोलनाचे तयारी होत नाही. काय फरक पडणार आहे. साडेतीन वर्षे सरकारवर विश्वास ठेवला आहे. आता आमदार प्रसाद लाड यांच्यावर विश्वास ठेवला आहे. त्यांच्यामधील तळतळ दिसली म्हणून. नाही झाले तरी बैठका बंद केल्यानंतर बंद झाल्या आहेत. याच्या अर्थाने अंतरवलीमध्ये समाज येणार नाही. समाजाचे वाटोळे कोणामुळे झाले आहे. त्यामुळे होणार नाही. मुख्यमंत्री शंभर टक्के करणार आहे. कशामुळे राजकारणासाठी वागायचे नाही. आंदोलन केलं तरी मिळणार आहे. नाही मिळालं नाही तर
काय आहेत मागण्या?
1) मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मे च्या आता कुणबी प्रमाणपत्र द्या.
2) सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थांचा GR काढा. 1994 च्या धर्तीवरच GR काढा.
3) महाराष्ट्रातील सर्व सरसकट गुन्हे मागे घ्या.
4) आंदोलनात बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा.
5) सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा.
6) महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप केले पाहिजे.
7) कुणबी प्रमाणपत्र दिलेले त्याची व्हॉलिडिटी द्या.
8) मराठा उपसमिती काही कामाची नाही, अध्यक्षाला काम नाही. उपसमिती बरखास्त करा.
9) स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा.
10) शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला लावा.
