Download App

Manoj Jarange : उद्या अल्टिमेटम संपणार, आज बीडमध्ये निर्णायक सभा; शाळा बंद

Manoj Jarange : मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली मुदत संपणार आहे. यानंतर पुढे काय असा प्रश्न विचारला जात असताना आज बीड येथे निर्णायक सभा होणार आहे. या सभेत मनोज जरांगे पाटील मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे आजच्या सभेत जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनही सज्ज झाले आहे. शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्या राज्य सरकारला दिलेली मुदत संपणार आहे. सरकारने या मुदतीत आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यामुळे आजच्या सभेत जरांगे पाटील काय रणनीती ठरवतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Manoj Jarange : नोटीसा देण्याच्या भानगडीत पडू नका, आरक्षण घेतल्याविना..; जरांगेंचा स्पष्ट इशारा

मनोज जरांगे पाटील काल रात्रीच बीडमध्ये पोहोचले आहेत. आज दुपारी दोन वाजता ते सभास्थळी पोहोचण्याची शक्यता आहे.  बीड शहरातील मराठा समाजबांधवांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. जरांगे पाटील आज मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. मात्र, यावेळीही चर्चा निष्फळ राहिली. त्यानंतर आता पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. आजच्या सभेत जरांगे पाटील याबाबत बोलतील असे सांगण्यात येत आहे.

राज्यातील 54 लाख नोंदी सापडल्या 

राज्यात 54 लाख नोंदी सापडल्या हा अधिकृत आकडा आहे. फक्त सरकारलाच सांगणारे आहेत असं नाही आम्हालाही सांगणारे लोक आहेतच. त्यांच्यातल्याच काही जणांना वाटतंय की आंदोलन सुरू राहावं. मी त्यांना सांगितलं होतं की अधिवेशनाचा वेळ वाढवा पण तसं केलं नाही. आता मात्र नोटीसा धाडल्या जात आहेत. त्यांनी आधी एक प्रयोग करून पाहिला आहे. ओता दुसरा प्रयोग करू नये, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम, सरकारला आतापर्यंत भरपूर वेळ दिला

सगेसोयरेच नाहीतर चारही शब्दांवर आम्ही ठाम आहोत. आधी 144 की आंदोलन हे आम्हाला माहिती नाही. मुंबईत जाणार म्हणून आम्ही कुठेही जाहीर केलेलं नाही. पण त्यांनाच वाटतंय की आम्ही मुंबईत यावं. त्यांनी नोटीसांच्या भानगडीत पडू नये. आंदोलन हाच आमच्यसमोर पर्याय आहे. सरकारनं सांगितलं होतं की आंतरवाली आणि राज्यातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार त्यामुळे 24 तारखेच्या आत सरकारने गुन्हे मागे घेऊन शब्द पाळावा असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

Tags

follow us