Manoj Jarange : ‘नोटीसा देण्याच्या भानगडीत पडू नका, आरक्षण घेतल्याविना’..; जरांगेंचा स्पष्ट इशारा

Manoj Jarange : ‘नोटीसा देण्याच्या भानगडीत पडू नका, आरक्षण घेतल्याविना’..; जरांगेंचा स्पष्ट इशारा

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्याबाबतीत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. आता ही मुदत संपण्यासाठी फक्त दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच आता जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. सरकारने आम्हाला नोटीसा देण्याच्या भानगडीत पडू नये. दोन दिवसांत जर आरक्षणाबाबत (Maratha Reservation) काही झालं नाही तर आम्ही आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. जरांगे पाटील यांनी आज परभणी जिल्ह्यातील सेलू येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला स्पष्ट शब्दांत इशारा दिला.

जरांगे पाटील पुढे म्हणाले, तुम्ही आम्हाला नोटीसा कशासाठी देत आहात ते आम्हाला चांगलं ठाऊक आहे. तुम्ही त्या भानगडीत पडू नका ही माझी तु्म्हाला विनंती आहे. तुम्ही एकदा प्रयोग केलात आता पुन्हा त्या भानगडीत पडू नका. सरकारनं काहीही करू द्या त्याच्याशी आम्हाला घेणंदेणं नाही.

मी प्रामाणिकपणाने त्यांना सांगतोय की त्यांनी नोटीसा देण्याच्या भानगडीत पडू नये. नोटीसा दिल्यानंतर संबंधित म्हणतो आता होऊनच जाऊ द्या, हे सरकारच्या लक्षात येत नाही का. विनाकारण नोटीसा धाडल्या जात असतील तर जो कुणी यात नाही तो सुद्धा येईल. सरकारने आधी ही गोष्ट लक्षात घ्यावी. मराठा आणि कुणबी हे आता सिद्ध झालं आहे. नोंदीही सापडल्या आहेत. 24 तारखेपर्यंत माझा सगळ्यांवरच विश्वास आहे. माझ्यासाठी सरकारमधले सगळेच चांगले आहेत. आणखी दोन दिवस वाट पाहू, असे जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange : नोटीस काढून सरकार-आंदोलकांमध्ये दरी पाडण्याचा प्रयत्न, मनोज जरांगे भडकले

दोन दिवसांत गुन्हे मागे घ्या, शब्द पाळा 

सगेसोयरेच नाहीतर चारही शब्दांवर आम्ही ठाम आहोत. आधी 144 की आंदोलन हे आम्हाला माहिती नाही. मुंबईत जाणार म्हणून आम्ही कुठेही जाहीर केलेलं नाही. पण त्यांनाच वाटतंय की आम्ही मुंबईत यावं. त्यांनी नोटीसांच्या भानगडीत पडू नये. आंदोलन हाच आमच्यसमोर पर्याय आहे. सरकारनं सांगितलं होतं की आंतरवाली आणि राज्यातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार त्यामुळे 24 तारखेच्या आत सरकारने गुन्हे मागे घेऊन शब्द पाळावा असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

राज्यातील 54 लाख नोंदी सापडल्या 

राज्यात 54 लाख नोंदी सापडल्या हा अधिकृत आकडा आहे. फक्त सरकारलाच सांगणारे आहेत असं नाही आम्हालाही सांगणारे लोक आहेतच. त्यांच्यातल्याच काही जणांना वाटतंय की आंदोलन सुरू राहावं. मी त्यांना सांगितलं होतं की अधिवेशनाचा वेळ वाढवा पण तसं केलं नाही. आता मात्र नोटीसा धाडल्या जात आहेत. त्यांनी आधी एक प्रयोग करून पाहिला आहे. ओता दुसरा प्रयोग करू नये, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube