Download App

Maratha Protest : …तर निजामाला 15 दिवसांसाठी घेऊन जायचे होते; माजी मुख्यमंत्री जरांगेंच्या निशाण्यावर

  • Written By: Last Updated:

Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवली गावात उपोषण सुरू केलं. सरकारने नमतं घेत कुणबी म्हणून नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी दाखले द्यायचं ठरवलं. मात्र, अद्याप आरक्षण मिळालं नाही. कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सरकारच्या मराठा आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. तसेच मराठवाड्यात मराठ्यांना आरक्षण दिले असेल तर पश्चिम महाराष्ट्रात मराठ्यांनी काय घोडे मारले, असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर आता मनोज जरांगे यांनी आपली प्रतिक्रिया दिला.

मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याविषयी विचारले असता ते म्हणाले, मला तर काय बोलावं कळतच नाही. मी महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देतो म्हणतो आहे, पश्चिम महाराष्ट्रात त्यांचाकडे निजाम होता की नव्हता, मला काय माहिती? निजामाला पश्चिम महाराष्ट्रात 8-15 दिवस घेऊन जायचे होते. निजाम इकडे होता का, तिकडे होता, घोडे मारलं का असं काहीही बोलायला लागले.

जरांगे म्हणाले, आम्ही त्यांचं घोडं मारले का? आम्ही आरक्षण मागितले आहे, तर मागू द्या ना. आम्हीही तुमचेचे आहो ना. कुणाला तरी एकाचं कल्याण होत राहिलं, ते होऊ द्या. मी तर जाहिरपणे म्हणतो सांगतोय की, सरसकट महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण द्या, हे बातम्या पाहत नाहीत का? त्यांच्याकडे टीव्ही नाही का? टीव्ही देऊन घेऊ का? असा प्रश्न जरांगे यांनी केला.

IND vs PAK : पाकिस्तानसमोर धावांचा डोंगर; विराटने इतिहास रचला, राहुलचे दणक्यात पुनरागमन 

ते म्हणाले, तुमच्याकडे निजाम होता आणि आमच्याकडे नव्हता. निजाम आमच्याकडे का आले नाही आणि इंग्रज तुमच्याकडे आमच्याकडे का आले नाहीत, असं ते म्हणत आहेत. मग त्यांनी 8-15 दिवस इंग्रज आमच्याकडे पाठवायचे होते, हे असं बोलणं चांगलं नाही. मी सरसकट महाराष्ट्राबद्दल बोलतोय, मग पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रात येत नाही का? सरसकट महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षणाची मागणी करतो आहे, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र या महाराष्ट्रातच असरणारच ना… मी माझा जीव जाळतोय, मी सगळ्यांना आरक्षण देणार आहे. मी एकही विभाग वगळणार नाही. मी कोरडा पडालया लागलो. त्यांनी तिकडं ताकद लावावी, माझ्याकडे लावू नये, असं जरांगे म्हणाले.

दरम्यान, जरांगे पाटील हे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. ते मागे हटालया तयार नाहीत. त्यांनी पाणी आणि उपचारही घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळं सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत नेमका या आरक्षणाबाबत काय तोडगा निघतो, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us