तुझे बावीस प्रकरणं माझ्याकडे आलेत, तू शहाणा व्हयं नाहीतर… मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा

Manoj Jarange: घातपात करणाऱ्यांना साथ देणाऱ्याचे चाळे बंद कर, नाहीतर लई बेक्कार होईल. माझे काहीच मॅटर नाही. तुझे टोळी आवर. तू शहाणं व्हयं.

Manoj Jarange On Dhanjay Munde

Manoj Jarange On Dhanjay Munde

Manoj Jarange On Dhananjay Munde : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) थेट मोठा इशारा दिला आहे. तुझे लई मॅटर माझ्याकडे आलेत. असे मॅटर घ्यायला लागलो तर तुझे लई हाल होतील. घातपात करणाऱ्यांना साथ देणाऱ्याचे चाळे बंद कर, नाहीतर लई बेक्कार होईल. माझे काहीच मॅटर नाही. तुझे टोळी आवर. तू शहाणं व्हयं. तुझे बावीस प्रकरण माझ्याकडे आलेत. तू शहाणा व्हयं. आजच नागपूरची महिला रडत मला भेटलेली आहे, असा इशाराच जरांगे यांनी धनंजय मुंडेंना दिलाय.


व्हीएसआरच्या मालकाची चौकशी करा; मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीत राष्ट्रवादीची मागणी

धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाबाबत जरांगे म्हणाले, नुसतं मंत्रिपद द्यायचे म्हणलं तर अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष प्रचंड ट्रोल झाला होता. मंत्रिपद दिलं तर पक्ष संपेल ना ? त्यामुळे त्यांना भाजपही जवळ करत नाही. रक्ताने हातं भरलेल्या लोकांना सरकार का सांभाळेल ? खून करणाऱ्यांना मंत्रिपद देतील का ? संतोष देशमुख यांना अजून न्याय मिळालेला नाही. भाजप आणि राष्ट्रवादी त्यांना मंत्रिपदच देणार नाही. मंत्रिपद दिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपून जाईल.

अजितदादांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करा, राष्ट्रवादीची मोठी मागणी तटकरेंची माहिती


धन्याने माझ्या नादी लागू नये-जरांगे

तू घातपाताच्या सुपाऱ्या देऊन आमचेच लोकं पुन्हा स्टँड केलेत. आम्हाला कळतं नाही का ? तू काळजी करू नका. धन्याने माझ्या नादी लागू नये. नागपूरमधील नागपूरकर आडनावाची एक महिला मला भेटली. तू खूप रडत होती. तिची खूप मोठी फसवणूक झालीय. तणावामुळे तिच्या नवऱ्याचा मृत्यू झालाय. तुझे असे खूप मॅटर माझ्याकडे आले आहेत. मी जर या मॅटरमध्ये हात घातला तर. त्यामुळे तू सावध व्हयं, असा इशारा जरांगे यांनी केलाय.


पुन्हा आंदोलनाच्या भूमिकेत आला तर सरकारला प्रचंड अडचणीत आणेल

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण दिलं आहे. सरकारमधील काहीची पोटदुखी असू शकते, असं वाटतंय. पुन्हा जर मराठ्यांच्या नादी लागला तर मग अवघड होईल. माझ्या तरी नादी लागू नका ? तुम्ही जीआर काढला आहे. तर मराठ्यांना प्रमाणपत्र वाटप करायला हरकत नाही. व्हॅलेडीटी जाणून बुजून देत नाही. शिंदे समितीला मुदतवाढ दिली. शिंदे समिती का नोंदी शोधत नाहीत, याचे उत्तर सरकारने देणार आहे की आंदोलन करावे लागणार आहे. सारथी, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबद्दल सांगितले आहे. मी या अधिवेशनाच्या नंतर एेकणार नाही. पुन्हा आंदोलनाच्या भूमिकेत आलो तर सरकारला प्रचंड अडचणीत आणेल.

Exit mobile version