Download App

मराठे आधी कोणाच्या अंगावर जाणार नाहीत, पण आता…; जरागेंचा थेट इशारा

मराठा आंदोलक मनोज जरांगेनी माध्यमांशी संवाद साधतांना भुजबळांवर टीका केली. मराठे आधी कोणाच्या अंगावर जाणार नाहीत, पण आता आम्हीही शांत बसणार नाही,

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange on Chhagan Bhujbal : ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) संरक्षणार्थ केलेलं उपोषण लक्ष्मण हाकेंनी (Laxman Hake) स्थगित केलं. हे उपोषण स्थिगित झाल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगेनी माध्यमांशी संवाद साधतांना भुजबळांवर टीका केली. मराठे आधी कोणाच्या अंगावर जाणार नाहीत, पण आता आम्हीही शांत बसणार नाही, असा इशारा जरांगेंनी दिला.

Marathi Directors : एका फ्रेममध्ये दिसले मराठमोळे दिग्दर्शक ! भेटीमागे नेमके खास कारण काय? 

मनोज जरांगेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, छगन भुजबळांना स्वत:ची लेकरं कळतात, तशी मग दुसऱ्यांची लेकरं कळायला पाहिजेत. धनगर आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावण्याचं भुजबळांनी कमी केलं पाहिजे. भुजबळ रस्त्यावर उतरण्याची भाषा करत आहेत. मराठा-धनगर समाजात जातीय दंगली घडवण्याचा त्यांचा डाव आहे. भुजबळ 100 टक्के दंगल घडवणार. धनगरांनी वाद निर्माण होऊ देऊ नये. भुजबळांच ऐकून वाटोळ करुन घेऊ नका. शेवटी निर्णय तुमचा आहे. त्यांचे वाघ आहेत, आमचे पण कुणीतरी असतीलच ना. आरक्षणाशिवाय आम्ही शांत बसणार नाही. मराठ्यांची वाटच लावायची ठरवी असेल तर आमचा नाईलाज आहे. होणारे परिणाम भोगायला तयार राहा, मराठा घरात बसणार नाही, असं जरांगे म्हणाले.

मोठी बातमी : मृदा, जलसंधारण विभागातील पदांसाठी फेरपरीक्षा; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा 

भुजबळ रस्त्यावर उतरण्याची भाषा करतो. मग मी हात बांधून बसू का? तुला जे करायचं ते कर, मराठे आधी कोणाच्या अंगावर जाणार नाहीत. मराठ्यांच्या अंगावर आले तर आम्ही सुध्दा रस्त्यावर उतरणार, असंही जरांगे म्हणाले.

हाकेंचं आंदोलन मॅनेज
राज्य सरकारमध्ये ओबीसी नेत्यांवर दबाव आहे. तेच आंदोलन करायला लावतात, सत्ताधारी म्हमून आम्ही येणार हे सर्व मॅनेज आहे. आमच्या आरक्षणात ते आहेत. त्यांना धक्का लागतोय की नाही हे आम्हाला माहिती नाही. पण, आमच्याकडे ओबीसींच्या नोंदी आहेत. सरकारने लाखो नोंदी दाबून ठेवल्यात. ब्रिटिश कालीन जनगणनेत मराठा कुणबी दाखवलाय. 1871 मधले पुरावे आहेत. तेही घेत नाहीत, असं जरांगे म्हणाले.

 

follow us