Download App

जरांगे पाटील पुन्हा आक्रमक ; 24 ऑक्टोबरपासून ना अन्न ना पाणी!

Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी 24 ऑक्टोबरपर्यंतची तारीख राज्य सरकारला दिली होती. अद्याप सरकारने मराठा आरक्षण जाहीर केले नाही. त्यामुळे अजून दोन दिवस बाकी आहेत. येत्या दोन दिवसांत मराठा आरक्षणावर निर्णय झाला नाही तर 24 ऑक्टोबरनंतर आमरण उपोषण पुन्हा सुरु करणार असल्याचे त्यांनी केले आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली आहे.

या उपोषणात कोणतेही उपचार घेणार नसून पाणी देखील पिणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मंत्री, आमदार, खासदार प्रशासनातील लोकांना गावबंदी करण्यात येणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली. आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये. शांततेतील आंदोलन मराठा सामाजाला आरक्षण मिळवून देईल, असे त्यांनी म्हटले आहे.

‘चुलीत गेला पक्ष मराठा आरक्षणच आमचं लक्ष्य’; जरांगेंच्या समर्थनात ‘मराठा’ मैदानात

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या गावात आज मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी मनोज जरांगे म्हणाले की राज्यातील मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याला गावात येऊ दिले जाणार नाही. प्रत्येक सर्कलमध्ये साखळी उपोषण करण्यात येणार आहे. सर्कलमधील सर्व गावाच्यावतीने उपोषणात होणार असल्याची माहिती जारांगे यांनी दिली.

प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात, प्रचंड संख्येने समाजाने एकत्रित येऊन कँडल मार्च काढण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. सध्या आंदोलनाची ही दिशा आहे. आंदोलन सुरु झाल्यानंतर 25 ऑक्टोबर नंतर पुन्हा आंदोलनाची नवी दिशा सांगितली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Tags

follow us