ॲट्रॉसिटी कायद्याचा साईड बिजनेस, हे एक मोठं रॅकेट; केतकी चितळेचं वादग्रस्त वक्तव्य

Ketaki Chitale : आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हीन पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं. ॲट्रॉसिटी (Atrocity) कायद्याचा साईड बिझनेस सुरू आहे, हे अख्खं रॅकेट आहे, असं वक्तव्य केतकीने केले. तिच्या या वक्तव्यामुळं नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. वीस वर्षांनंतर राज्यात 11 हजार शिक्षकांची पदभरती, शिक्षण आयुक्तांची माहिती  परळीतील राज्यस्तरीय […]

ॲट्रॉसिटी कायद्याचा साईड बिजनेस, हे एक मोठं रॅकेट; केतकी चितळेचं स्फोटक वक्तव्य

Ketaki Chitale

Ketaki Chitale : आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हीन पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं. ॲट्रॉसिटी (Atrocity) कायद्याचा साईड बिझनेस सुरू आहे, हे अख्खं रॅकेट आहे, असं वक्तव्य केतकीने केले. तिच्या या वक्तव्यामुळं नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

वीस वर्षांनंतर राज्यात 11 हजार शिक्षकांची पदभरती, शिक्षण आयुक्तांची माहिती 

परळीतील राज्यस्तरीय ब्राम्हण ऐक्य परिषदेला संबोधित करत असतांना केतकी म्हणाली की, गेल्या पाच वर्षात किती ॲट्रॉसिटी दाखल झाल्या आहेत? ब्राम्हणांच्या विरोधात किती केसेस दाखल केल्या गेल्या? याची आरटीआयमधून माहिती मागवा. तुम्हाला हा आकडा पाहून धक्का बसेल. कारण हे अख्खं रॅकेट आहे, असं केतकी म्हणाली.

दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, महावितरणमध्ये ६० रिक्त जागांसाठी भरती, कधीपर्यंत करता येणार अर्ज? 

ती पुढं म्हणाली, हे रॅकेट असून यात बरेच वकिल आहेत. एका वकिलाने गेल्या १५ ते २० वर्षात ६२ ॲट्रॉसिटी  केसेसे टाकल्या. मी त्या वकिलांचं नाव घेऊ शकत नाही. पण त्याच्याबरोबर कायम एकच विटनेस असतो. त्याने अलीकडेच दादरच्या एका टिसीवर ॲट्रॉसिटीची केस टाकली. कारण लोकलने प्रवास करत असताना टीसीने थांबवलं. तिकिट भरायला सांगितललं. तर त्याने जात बघून मला अडवलं अशी ॲट्रॉसिटीची केस टाकली. हा फक्त एक वकील आहेत. असे अनेक वकील आहे. अॅट्रॉसिटी हा साईड बिजनेस असून ते मोठं रॅकेट आहे, असं केतकी म्हणाली.

याआधी केतकीने अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. आता ॲट्रॉसिटी  हा साईड बिजनेस असल्याचं वक्तव्य करत तिने एका समाजालाच लक्ष्य केलं. त्यामुळं आता केतकीच्या वक्तव्यामुळे तिच्यावर काय  कारवाई होते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Exit mobile version