दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, महावितरणमध्ये ६० रिक्त जागांसाठी भरती, कधीपर्यंत करता येणार अर्ज?

  • Written By: Published:
दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, महावितरणमध्ये ६० रिक्त जागांसाठी भरती, कधीपर्यंत करता येणार अर्ज?

Mahavitaran Recruitment 2024 : आज अनेकजण चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवणं हे फार कठीण आहे. मात्र, तुम्ही दहावी पास असाल आणि उत्तम नोकरीच्या (Job) शोधात असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Power Distribution Company Limited), नागपूर अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

Sonu Sood Post: शाळा आणि शिक्षणाच्या उभारणीसाठी सोनू सुदचे नवे पाऊल, म्हणाला….

पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी या पदासाठी अर्ज करावा. या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असावी? वयोमर्यादा काय असावी आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? याबाबत जाणून घेऊ.

Pankaj Udhas Passed Away : ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचं निधन 

शिकाऊ उमदेवारांच्या एकूण 60 जागा रिक्त आहेत. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करावा. पात्र उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण नागपूर असेल. या पदासाठी अर्ज करताना उमेदवाराचे वय 18 ते 31 वर्षे दरम्यान असावे. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे. विशेष बाब म्हणजे, या भरतीसाठी प्रक्रियेसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारही सहज अर्ज करू शकतात.

10वी पास आणि ITI पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी सहज अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाइन अर्ज करावा लागेल. आता अर्ज करण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत.

अर्ज कसा करावा?
उमदेवारांनी प्रथम http://www.mhrdnats.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी आणि ऑनलाईन नोंदणी करावी. शैक्षणिकदृष्ट्या पात्र उमेदवारांचाी नोंदणी ग्राह्य धरली जाईल. ऑनलाइन अर्ज भरतांना उमदेवारांनी आपली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील. उशीरा आलेले आणि अर्धवट माहिती असलेले अर्ज प्राप्त झाल्यास अर्ज नाकारले जातील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज