Marathwada Cabinet Meeting : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. ही बैठक गाजली अधिकारी आणि मंत्र्यांच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधील मुक्कामामुळे. राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटात असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी कोट्यावधींचा खर्च होत असल्याने विरोधी पक्षांसह सर्वच क्षेत्रातून जोरदार टीका केली जात होती. अखेर सरकारला सद्बुद्धी सुचली फाईव्ह स्टारवरुन मुक्काम शासकीय विश्रामगृहात हालवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आम्ही विश्रामगृहात मुक्काम केल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबलो नाहीत, शासकीय विश्रामगृहात थांबलो आहेत. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कोण थांबले होते माहिती आहे का? मुंबईत बैठकीला आलेले धर्मशाळेत थांबले होते का? 100 रूम्स त्यांनी बुक केल्या होत्या. आम्ही मराठवाड्याला 59 हजार कोटींचे पॅकेज दिले आहे.
बोलघेवड्या शिंदे-फडणवीसांपेक्षा ‘मविआ’च बेस्ट; पटोलेंचा पुरावा देत हल्लाबोल
दरम्यान, तब्बत सात वर्षांनी मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही बैठक झाली. या बैठकीत मराठवाड्यात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मराठवाड्याच्या विकासासाठी एकूण 46 हजार 90 लाख खर्च करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं.
तसंच मराठवाड्यात विकाम कामे, योजनांसाठी 37 हजार 16 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. तर आजच्या कॅबिनेटमध्ये राज्य/मराठवाड्यासाठी 9 हजार 437 कोटी 90 लाख खर्च करण्याचे नियोजन आहे. नदी जोड प्रक्रल्पासाठी 14 हजार कोटी खर्च केले जाणार आहे. असे मिळून मराठवाड्यासाठी एकूण 59 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात येणार आहेत.