बहीण हरली, भाऊ जिंकला…धनंजय मुंडेंचा परळीत पंकजा ताईंना व्हाईट वॉश!

Market Committee Election : परळी वैद्यनाथ या अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बहीण हरली तर भाऊ जिंकला असे चित्र पाहायला मिळाले. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वातील वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनलने या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना व्हाईट वॉश दिला आहे. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वातील पॅनलच्या सर्व 18 च्या 18 जागा निवडून आल्या आहेत. […]

Untitled Design   2023 04 29T193322.677

Untitled Design 2023 04 29T193322.677

Market Committee Election : परळी वैद्यनाथ या अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बहीण हरली तर भाऊ जिंकला असे चित्र पाहायला मिळाले. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वातील वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनलने या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना व्हाईट वॉश दिला आहे. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वातील पॅनलच्या सर्व 18 च्या 18 जागा निवडून आल्या आहेत. यामुळे या निवडणुकीत भावाने बहिणीला मात देत जोरदार राजकीय धक्का दिला आहे. तसेच पुन्हा एकदा निवडणुकीच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे.

राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी (APMC Elections) शुक्रवारी मतदान पार पडले. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली व बाजार समित्यांचे निकाल देखील हाती आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सबंध बीड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीचा बालेकिल्ला असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालातून सिद्ध केले आहे.

परळी वैद्यनाथ मतदारसंघातील परळी व अंबाजोगाई या दोनही बाजार समित्यांवर धनंजय मुंडे यांनी एकेरी वर्चस्व प्रस्थापित करत भाजप नेतृत्वास मोठा धक्का दिला आहे. अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवत असलेल्या योगेश्वरी शेतकरी विकास पॅनलच्या 18 पैकी 15 जागा निवडणूक आल्या आहेत. तर परळी वैद्यनाथ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 18 पैकी 18 जागा धनंजय मुंडे यांच्या वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनलने जिंकल्या आहेत. दरम्यान निवडणुकीतील विजयानंतर धनंजय मुंडे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले असून सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. तसेच हा विजय शेतकरी नेते, स्व. पंडित अण्णा मुंडे यांना समर्पित करत असल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

अवकाळी पावसाने झोडपलं अन् होत्याच नव्हतं झालं…

पराभवानंतर पंकजा म्हणाल्या…
या मार्केट कमिट्या धनंजय मुंडे यांच्या ताब्यात होत्या व त्याच्याच ताब्यात राहिल्या. यामुळे इथे पराभव स्वीकारण्याचा विषयच नाही. बाजार समिती निवडणुकीत विधानसभा व लोकसभा सारखा अंदाज बांधता येत नसतो. आम्हाला माहिती होत कि आमच्याकडे किती मत आहे व आम्हाला किती मत मिळतील. मात्र ज्यांनी आपला गड राखला म्हणजेच धनंजय मुंडे यांचे अभिनंदन अशा शब्दात पंकजा यांनी भावाला विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version