Download App

ब्रेकिंग : पहिले शारीरिक, मानसिक छळाचे आरोप अन् आता फुलस्टॉप; सिद्धांत शिरसाट प्रकरणात ट्विस्ट

  • Written By: Last Updated:

Married Woman Withdraws Allegations Of Harrasment From Siddhant Shirsat : राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर करण्यात आलेले आरोप संबंधित महिलेने मागे घेतले आहेत. हे माझे वैयक्तिक प्रकरण असून त्यावर कुणीही राजकारण करू नये असं सांगत संबंधित महिलेने आपण केलेले सर्व आरोप (Allegations) मागे घेत असल्याचे स्पष्ट केले. महिलेच्या या यूटर्नमुळे या प्रकरणाता मोठा ट्विस्ट आला असून, पहिले गंभीर आरोप आणि आता आरोपांवर फुल्ल स्टॉपची भूमिका यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

‘त्यांना पोलीस डिपार्टमेंटकडून हवं तितकं मिळत नाही…’ इम्तियाज जलील यांचे शिरसाटांवर गंभीर आरोप

संजय शिरसाट यांच्या मुलावर आरोप नेमके काय होते?

सिद्धांत शिरसाट आणि गंभार आरोप करणाऱ्या महिलेची सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून 2018 मध्ये ओळख झाली होती. ओळखीचे पुढे मैत्रीत रुपांतर झाले. पुढे चेंबूर येथील एका फ्लॅटवर प्रत्यक्ष भेटही झाली होती. सिद्धांतकडून महिलेकडे लग्नासाठी तगादा लावला जात होता. परंतु, महिला आधीच विवाहीत होती.

लग्नानंतर सिद्धांतच्या वर्तणुकीत बदल झाला

सिद्धांत यांनी ब्लॅकमेल करत लग्न कर नाहीतर मी आत्महत्या करेन असा आग्रह धरला होता. नंतर सिद्धांतच्या भावनिक आवाहनावर विश्वास ठेऊन लग्न केलं. सिद्धांत शिरसाट यांच्यासोबत 14 जानेवारी 2022 रोजी विवाह केल्याचा दावा महिलेने केला आहे. लग्नानंतर मात्र सिद्धांतच्या वर्तणुकीत बदल झाला. त्यांनी मला चेंबूरमधील फ्लॅटमध्येच राहण्यास सांगितल्याचे महिलेने सांगितले. तसेच छत्रपती संभाजीनगरला येण्यास नकार दिला होता. तू जर पोलिसांकडे गेली तर मी आत्महत्या करेन आणि तुझं संपू्र्ण कुटुंब उद्ध्वस्त करेन.  माझे वडील लवकरच मंत्री होणार आहेत. ते एकनाथ शिंदे यांचे उजवे हात आहेत, अशी धमकी दिली जात होती असा आरोप या महिलेने केला होता.

उद्धव ठाकरेंचा वाढदिवस, राजवट अन् पाऊस… तरी मुंबई बुडाली नव्हती, नारायण राणेंची तुफान फटकेबाजी 

पोलिसांत तक्रार पण कारवाई नाही..

संबंधित महिलेने 20 डिसेंबर 2024 रोजी शाहूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु, या तक्रारीवर पोलिसांकडून काहीच कारवाई झाली नाही. सिद्धांत यांचे वडील मंत्री असल्याने प्रकरण दाबण्यात आल्याचा आरोप शिरसाट यांच्या मुलाला पाठवण्यात आलेल्या कायदेशीर नोटीसीत करण्यात आला होता. चेंबूर येथे वडिलांच्या नावावर फ्लॅट आहे. या ठिकाणीच सिद्धांत आणि संबंधित महिलेचं लग्न झालं होतं. दोन वर्षे चांगली गेली. नंतर सिद्धांतचे आणखी एका मुलीसोबत प्रेमसंबंध सुरू झाले. पुढे त्याने या महिलेकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. मानसिक छळ केला. सिद्धांत इमोशनल ब्लॅकमेलही करायचा असा आरोप महिलेने केला होता.

बीड जिल्ह्यासाठी अपघाती सत्र! मुंडे, मेटे आणि आता आर. टी देशमुख…संशयाचं मळभ मात्र कायम…

माझ्या खांद्यांवरून कुणीतरी…

हे माझं वैयक्तिक प्रकरण असून, या प्रकरणाला पूर्णविराम द्यायचा आहे. माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणीतरी स्वताचं हित साध्य करू नये असेही पीडित महिलेने म्हटले आहे. त्यामुळे एकीकडे सिद्धांत शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ माजवणाऱ्या याच महिलेने मला हे प्रकरण वाढवायचं नसल्याचे सांगत या प्रकरणाला पूर्णविराम दिल्याने मोठा ट्विस्ट आला आहे.

follow us