क्रोर्याची सीमा गाठली! शिपायाने मतिमंद विद्यार्थ्याचे हात बांधले अन् बेदम मारले…

छत्रपती संभाजीनगरमध्ये मतिमंद निवासी विद्यालयात विद्यार्थ्याला शिपायाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आलीयं.

Untitle (19)

Untitle (19)

Chatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये मतिमंद विद्यार्थ्यांच्या निवासी विद्यालयात लहान मुलांवर बेदम मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये गतिमंद मुलाचे हात पाठमागे बांधलेले असताना शिपाई त्याला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या अमानवी कृत्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या मांडकी गावातील चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालयात हा प्रकार घडला असून एका लहान मुलाला शिपाई दीपक इंगळे याने बेदम मारहाण केल्याची घटना घडलीयं.

उपमुख्यमंत्री पदाच्या विक्रमानंतर अजित पवारांचा दुसरा विक्रम; सलग चौथ्यांदा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनच्या अध्यक्षपदी

या मतिमंद विद्यार्थ्यांच्या निवासी विद्यालयातील ही एवढीच घटना नसून अनेक विद्यार्थ्यांना अत्याचाराला सामोरे जावं लागत आहे. विद्यालयातील केअरटेकर प्रदीप देहाडे याने देखील विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांकडे जमा करण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये देहाडे या विद्यार्थ्यांच्या छातीवर पाय ठेवून मारहाण करीत असल्याचं दिसून येत आहे. तर एका विद्यार्थ्याचे हात पाठिला बांधून शिपाई कुक्करने मुलाला मारहाण करीत आहे.

विश्वविजेते होताच भारतीय संघावर होणार पैशांचा वर्षाव; बीसीसीआय देणार कोटींचे बक्षीस

दरम्यान, या घटनेनंतर मतिमंद मुलांना होत असलेली ही अमानुष वागणूक मनाला चटका देणारी असून या प्रकरणात दोषींवर कडक कारवाईची मागणी जोर धरु लागली आहे. तक्रारदार प्रतिम घंगाळे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून घंगाळे यांनी विद्यालयाच्या प्रशासनावर गंभीर आरोप केलेले आहेत. घंगाळे यांनी मारहाणीचा व्हिडिओ दिव्यांग आयुक्तांना पाठवला, त्यानंतर या प्रकरणाची सुत्रे हलली. दिव्यांग आयुक्तालयाकडून या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची चाहूल संस्थेच्या चालकांना लागल्यानंतर संस्थाचालकांनी पुढे येत चिखलठाणा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलीयं.

Exit mobile version