Download App

संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, वाल्मिक करांडाबद्दल म्हणाले, ‘ते नागपुरात…’

संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे. माझे नाव आरोपींसोबत जोडल्याची घटना सभागृहात अनेकदा घडली.

  • Written By: Last Updated:

Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमु (Santosh Deshmukh) यांची 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली. हे हत्या प्रकरण राज्यात चर्चेचा विषय बनलं. या प्रकरणाची योग्य चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी विरोधक करत आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड (Valmik Karad) यांच्यावर हत्येचा आरोप होतोय. मुंडे यांचे नाव घेत त्यांच्यावर देखील आरोप होताहेत. दरम्यान, या प्रकरणात प्रथम माध्यमांच्या समोर येत धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) आपली भूमिका मांडली आहे.

सर्वात मोठी अपडेट, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ‘या’ दिवशी होणार भारत – पाकिस्तान सामना 

संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे. माझे नाव आरोपींसोबत जोडल्याची घटना सभागृहात अनेकदा घडली. या प्रकणाचा तपास सीआयडी करत आहे. त्यामुळं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असं मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, कोणीही हत्येचे समर्थन करू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. एसआयटी नेमण्यात आली आहे. सीआयडी नेमल्यानंतर अगदी शेवटपर्यंत तपास होणार आहे. कोण होतं, काय होतं ? आदल्या दिवशी जो गुन्हेगार आहे, तो आणि त्याचा भाऊ एक पोलीस अधिकाऱ्यासोबत हॉटेलमध्ये चहा पीत होते आहे, असा एक व्हिडिओ समोर आला आहे. तो व्हिडिओही सर्व चॅनेल्सवर दाखवण्यात आलाय, या सर्व गोष्टी तपास यंत्रणेनं काढणं गरजेचं आहे.

मनोरा आमदार निवासाचे बांधकाम कधी पूर्ण होणार? विधानसभा अध्यक्षांनी दिली माहिती… 

दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल…
पुढं ते म्हणाले, या प्रकरणात मकोका लावण्याच्या बाबतीत मुख्यमंत्री बोलले आहेत. मकोका लावायचा असेल तर बीड जिल्ह्यात अशी अनेक प्रकरणे आहेत, त्याही प्रकरणात मकोका लागला पाहिजे. या भूमिकेचा मी आहे. आता मुख्यमंत्र्यांनी या गोष्टींवर निवेदन केलेलं आहे. त्यामुळे साहजिकच सर्वजण त्यावर समाधानी आहेत. या प्रकरणाचा संबंध माझ्याशी जोडणं आणि माझ्यावर आरोप करणं या सदनात अनेकदा असे प्रकार घडलेले. शेवटी पोलीस तपास करतील. त्यांनी या प्रकरणाचा तपासही सीआयडीकडे सोपवला आहे. त्यामुळं तपासात दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असंही मुंडे म्हणाले.

पुढे बोलतांना मुंडे म्हणाले, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काय बोलावे हे मला सांगता येत नाही. वाल्मिक कराड हे नेमकं नागपुरात कुठं आहेत? हे त्यांनी सांगितलं असतं पोलिसांनी त्यांनाही अटक केली असती. या आरोपींनी जशा पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या केली, त्यांना फाशी झाली पाहिजे. ही माझी भूमिका आहे, असं मुंडे म्हणाले.

follow us