Download App

आयोजक हात जोडत होते, लोक निघून जात होते; सत्तारांची वेगळीच अडचण

  • Written By: Last Updated:

औरंगाबादः हिवाळी अधिवेशनात गायरान जमिनीच्या प्रकरणातून कृषिमंत्री अब्दुल सत्तारांना विरोधकांनी घेरले होते. अधिवेशन संपल्यानंतर सत्तारांनी माझ्याविरोधात शिंदे गटातील जवळचे नेते अडचणीत आणत असल्याचे गौप्यस्फोट केला होता. तर सत्तारांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात एक अडचण आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभेला येणार नसल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिक हे कार्यक्रमस्थळाहून निघून जात होते. त्यावेळी कार्यक्रमाचे आयोजक हे हात जोडून लोकांना निघून जाऊ नका, असे सांगत होते. तरी लोक निघून गेले.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी दुपारी हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे, मंत्री संदिपान भुमरे हे उपस्थित राहणार होते. कार्यक्रमास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. त्यावेळी अचानक लोक निघून जाऊ लागले. त्यावेळी आयोजक ही सूचना देत होते. मुख्यमंत्री येणार नाहीत, कार्यक्रम रद्द झाला आहे, अशी क्लीप कोणीतरी सोडली आहे. ते चुकीचे आहे. एका सेकंदात ध चा म होत असतो, सर्वांना विनंती आहे. खुर्च्यांवर येऊ बसावे, अशा सूचना आयोजकांकडे देण्यात येत होते.

आयोजक हे हात जोडतो निघून जाऊ नका, असे सांगत होते. तरी नागरिक हे कार्यक्रमाच्या ठिकाणावरून निघून गेले. त्यामुळे काही वेळाने आयोजकांना कार्यक्रमच रद्द करावा लागला आहे. मुलींचे टीईटी घोटाळ्यात नाव, विरोधकांवर होत असलेल्या आरोपामुळे अडचणीत सापडलेल्या सत्तारांना वाढदिवसाच्या दिवशीही वेगळ्याच अडचणीचा सामना करावा लागला आहे.

Tags

follow us