Download App

जालना क्रिप्टो करन्सी प्रकरण सभागृहात मांडणार, आमदार कैलास गोरंट्याल आक्रमक

जालना : राज्यात खळबळ उडवून देणारं जालना जिल्ह्यातील क्रिप्टो करन्सी प्रकरण (Jalna Crypto Currency)सभागृहात मांडणार असल्याची माहिती जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल (MLA Kailas Gorantyal)यांनी सांगितलंय. त्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केलीय. क्रिप्टो करन्सी प्रकरणात प्रमोटर किरण खरात (Kiran Kharat)यांचं अपहरण करून त्यांच्या घरावर फायरिंग (Gun Fire)करण्यात आली. याप्रकरणी कारवाईसाठी आम्ही निवेदनं दिल्याचंही यावेळी आमदार गोरंट्याल यांनी सांगितलंय.

अशा गुंड लोकांवर पोलीस कोणतीही कारवाई करत नाही, त्यामुळं फायरिंग करणाऱ्या या गुंड लोकांवर कारवाई करावी यासाठी अधिवेशनात क्रिप्टो करन्सी प्रकरणाचा विषय मांडणार असल्याचं गौरंट्याल यांनी म्हटलंय.

निवडणूक आयोगाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, देशातील निवडणुकांमध्ये बदल होईल?

घडलं असं की, जीडीसीसी या क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून जिल्ह्यात 116 लोकांकडून 2 कोटी 69 लाख रुपयांची फसवणूक झाल्याबाबत केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणात किरण खरात यांच्यासह इतरांवर गुन्हेही दाखल केले होते. दरम्यान, या प्रकरणी जिल्ह्यातील शंभराच्यावर लोकांनी सायबर गुन्हे शाखेकडं फसवणुकीची तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर याबाबत सायबर गुन्हे शाखेनं तपास सुरू केला होता. या प्रकरणात फसवल्या गेलेल्यांमध्ये माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. यामुळं हे प्रकरण जिल्ह्यासह राज्यात चांगलंच गाजलं. या प्रकरणी किरण खरात यांच्यासह इतरांवरही क्रिप्टो करन्सीत फसवणूक झाल्याच्या आरोपावरून गुन्हे दाखल झाले आहेत.

Tags

follow us