Download App

ओमराजे निंबाळकरांचे खास मित्र आमदार कैलास पाटलांना चक्कर; रुग्णालयात दाखल

  • Written By: Last Updated:

Kailas Patil Admitted to hospital : सध्या देशभरात लोकसभेच्या निवडणुकांचं वादळ सुरू आहे. तर, उमेदवारही मोठी रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. दरम्यान, जस-जस निवडणुकांचं वातावरण तापतं आहे तशा-तशा उन्हाच्याही झळा चांगल्याचं पोळायला लागल्या आहेत. आज धाराशिवचे विद्यमान खासदार आणि (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीचे उमेदवार (Omraje Nimbalkar) ओमराजे निंबाळकर यांनी दुसऱ्यांदा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी आयोजित केलेल्या सभेत ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील (Kailas Patil) हेही सहभागी झाले होते. दरम्यान, उन्हाचा पाऱ्हा वाढल्याने कैलास पाटील यांना भरसभेत चक्कर आल्याची घटना येथे घडली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

पाटील व्यासापिठावरून खाली कोसळले

ओमराजे निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी माजी मंत्री काँग्रेस नेते अमित देशमुख, माजी मंत्री अदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार, आमदार सचिन आहेर यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. ओमराजे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापू्र्वी तुळजापूर येथे आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या सभेच आजोजन केलं होतं. मात्र, हा कार्यक्रम दुपारच्या वेळी असल्याने उन्हाचा पाऱ्हाही चांगलाचं वाढला होता. त्याचा परिणाम येथे दिसून आला. या सभेत उपस्थित असलेले आमदार कैलास पाटील यांना चक्कर येऊन ते व्यासापिठावरून खाली कोसळल्याची घटना घडली.

 

ओमदादा जिगर का तुकडा

मला अेक ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी बोलावलं होतं.परंतु, माझा ओमदादा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्याचा अर्ज भरण्यासाठी मला जावं लागेल म्हणून न थांबता सगळेच उमेदवार महत्वाचे आहेत. मात्र, ओमदादा जिगर का तुकडा आहे असं म्हणत आदित्य ठाकरेंनी आपलं आणि ओमराजे निंबाळकरांच नात घट्ट असल्याचं यावेळी सांगितलं. दरम्यान, आदित्य ठाकरे यांचं भाषण सुरू असतानाच काँग्रेस नेते अमित देशमुख यांचं आगमन झालं. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी अमित देशमुखांची गळाभेट घेतली.

 

यामुळे कैलास पाटील राज्यभरात परिचीत

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर आमदार कैलास पाटील हे सुरतमार्गे गुवाहटीला जाणाऱ्या नेत्यांच्या गाडीत होते. मात्र,त्यानंतर ते थेट मुंबईतील मातोश्री बंगल्यावर दाखल झाले. तसंच, त्यांनी आपल्याला जायच नसताना बळजबरी करत सोबत नेलं होत अशी जाहीर कबूली दिली होती. त्यानंतर घडलेला घटनाक्रम त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माध्यमांसमोरही मांडला होता. त्यामुळे, कैलास पाटील राज्यभर परिचीत झाले होते.

follow us