Download App

आमदार संदीप क्षीरसागरांनी धमकावल्यानंतर पालिका कर्मचाऱ्याची थेट पोलिसांत तक्रार; दमानिया आक्रमक

MLA Sandeep Kshirsagar यांनी नगरपालिकेतील अकाउंटंट गणेश पगारे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

MLA Sandeep Kshirsagar threatened Municipal employee Damania aggressive : बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी नगरपालिकेतील अकाउंटंट गणेश पगारे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर या कर्मचाऱ्याने पोलिसांकडे त्यांची तक्रार देखील केली आहे. त्यावरून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

गणेश तुळशीराम पगारे हे नगरपरिषदेत कर्मचारी असून, त्यांनी आज पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आज सुट्टी असल्याने मी मोबाईल सायलेंट करुन झोपलेलो होतो. यावेळी माझ्या मोबाईलवर आ. संदीप रविंद्र क्षीरसागर यांचे मिस्ड कॉल पडले आहेत. तर काही वेळाने मला मुलाने खाली कोणीतरी आले आहे असे सांगितले.

सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, ‘त्या’ प्रकरणात हर्षवर्धन सपकाळांची मागणी

यावेळी मी बाहेर आलो असता आमदार संदीप क्षीरसागर यांचे चौरे नामक त्यांचे स्वी सहायक व इतर काहीजण अनोळखी घरी आले होते. मी त्यांना काय झाले विचारलं असता त्यांनी आमदार साहेब बोलणार आहेत असे म्हणाले. तर मी माझ्या फोनवरून बोलतो. असे म्हणताच त्यांनी माझ्याच नंबर वरुन बोला असे म्हटले आणि फोन लावून माझ्याकडे दिला. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर यांनी फक्त गोडगोड बोलतो कारे म्हणून आय, मायवर शिवीगाळ केली. तसेच ढोपरावर वार केले तर कसे होईल असे म्हणाले.

ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही; गोगावले अन् शिवसेनेच्या अनुपस्थितीवर तटकरे नाराज

मी फक्त भैय्या काय झालं असं विचारत असताना ते मात्र शिव्यांची लाखोली वाहीली. यावेळी पत्नी, आई यांनी काय झाले विचारले मी त्यांना हा प्रकार सांगितला असता ते घाबरुन गेले आहेत. तर आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांपासून धोका असून, ते माझ्यावर हल्ला करुन जीवे मारु शकतात. यामुळे आम्ही सर्वजण दहशतीखाली आहोत. आमच्या जीवाला काही धोका झाला तर यास आ. क्षीरसागर आणि त्यांचे समर्थक कारणीभूत असतील असे म्हणून पोलीस संरक्षण देण्याची मागणी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे गणेश पगारे यांनी केली आहे. या घटनेने बीड शहरात खळबळ उडाली आहे.

follow us