ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही; गोगावले अन् शिवसेनेच्या अनुपस्थितीवर तटकरे नाराज

ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही; गोगावले अन् शिवसेनेच्या अनुपस्थितीवर तटकरे नाराज

Sunil Tatkare on Bharat Gogavale and Shivsena Absenty in Amit Shah Meet Raigad : गृहमंत्री अमित शाह आज रायगड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्या निवासस्थानी भोजनासाठी गेले होते. त्यानंतर तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत या कार्यक्रमासाठी नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. तर यावेळी तटकरेंना या कार्यक्रमासाठी अनुपस्थित राहिलेल्या भरत गोगावलेंबद्दल विचारले.

काय म्हणाले सुनील तटकरे?

आज गृहमंत्री अमित शाह यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. यावेळी केवळ राज्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचं अभूतपुर्व कार्य यावर चर्चा झाली. त्यावर शाह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच या भेटीमुळे रायगड किल्ल्याच्या जतन संवंर्धनाला गती येईल. तसेच यावेळी महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवन ठेवण्यात आलं होतं. असं तटकरे म्हणाले.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी बजावली नोटीस

या कार्यक्रमाला सर्व नेते उपस्थित होते. मात्र शिवसेनेचे भरत गोगावले, उदय सामंत आणि इतर नेते यांच्या अनुस्थितीवर विचारले असता ते म्हणाले की, माझं कर्तव्य होतं त्यामुळे मी भरत गोगावले, उदय सामंत, महेंद्र दळवी यांना सर्वाना निमंत्रण दिलं होतं. मात्र ते आले नाही. ते का आले नाही मला माहिती नाही. पण राजकारण आणि विशिष्ट गोष्टींपलीकडे सामाजिक जीवनात परस्परांचे संबंध राहिले पाहिजेत. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. आमच्यावर ते संस्कार आहेत. पण यावर मला जास्त काही बोलायचं नाही. अशी प्रतिक्रिया तटकरे यांनी दिली.

… म्हणून भरत गोगावले अन् शिवसेना अनुपस्थित

follow us
  • fb
  • instagram
  • youtube