Raj Thackeray : आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) मराठवाड्यावर लक्ष केंद्रीत केले आहेत. या दौऱ्यातच त्यांनी निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. काल हिंगोलीत असताना त्यांनी मनसेचे हिंगोली जिल्हाप्रमुख प्रमोद (बंडू कुटे) यांनी उमेदवारी जाहीर केली. राज ठाकरे यांच्या या खेळीने महाविकास आघाडी आणि महायुती दोघांतही अस्वस्थता निर्माण झाली आहे. निवडणुकीसाठीचा राज ठाकरेंचा हा डावा कुणाला फटका देतोय याचं उत्तर निकालानंतरच मिळणार आहे.
…काही विद्वान आपल्या महाराष्ट्रात फिरतायत; आंबेडकरांच्या शिलेदाराचा राज ठाकरेंना खरमरीत टोला
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यांनी आपले उमेदवारही रिंगणात उतरवले नव्हते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही त्यांच्याकडून अशीच भूमिका घेतली जाईल असे वाटत होते. परंतु, त्यांनी नवी रणनीती आखत स्वबळावर लढण्याची घोषणा केली. फक्त घोषणा करूनच राज ठाकरे थांबले नाहीत तर त्यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. पाच उमेदवारही फायनल केले आहेत.
दौरा सुरू करण्याआधी त्यांनी निरीक्षक पाठवून राज्यातील मतदारसंघांची चाचपणीही केली होती. पुढील टप्प्यात मराठवाडा दौरा सुरू केला. याच दौऱ्यात काल राज ठाकरे हिंगोलीत होते. येथेही त्यांनी हिंगोलीचे जिल्हाप्रमुख बंडू कुटे यांना उमेदवारी जाहीर करून टाकली. राज ठाकरे यांनी कुटेंच्या खांद्यावर हात टाकत आता तुम्ही यांच्याकडे लक्ष द्या असे आवाहन हिंगोलीकर आणि मनसैनिकांना केले.
कशाबशा 100 जागा मिळविण्यासाठी कुटुंबासह दिल्लीचे उंबरे झिजवताहेत, भाजपचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
हिंगोली मतदारसंघाचा विचार केला तर येथे सध्या भाजपाचे तानाजी मुटकूळे आमदार आहेत. मनसेने बंडू कुटे यांना तिकीट दिलं आहे. तसेच जागावाटपानंतर महाविकास आघाडीचाही उमेदवार मतदारसंघात असेल त्यामुळे हिंगोली मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहण्यास मिळेल अशी शक्यता आहे. राज ठाकरेंनी या दौऱ्यात आतापर्यंत चार उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये दोन मतदारसंघात भाजपशी लढत होणार आहे. पंढरपूर आणि हिंगोलीत भाजपाचे आमदार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपाचं कौतुक करणारे राज ठाकरे आता विधानसभा निवडणुकीत लढण्याच्या मूडमध्ये राहणार आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी आतापर्यंत चार उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर, वरळी मतदारसंघातून संदीप देशपांडे, पंढरपूरमधून दिलीप धोत्रे तर हिंगोली मतदारसंघातून बंडू कुटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघातून संतोष नागरगोजे यांचं नाव फायनल करण्यात आल्याची चर्चा आहे.