…काही विद्वान आपल्या महाराष्ट्रात फिरतायत; आंबेडकरांच्या शिलेदाराचा राज ठाकरेंना खरमरीत टोला
Utkarsha Rupwate on Raj Thackeray : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचाव यात्रा सुरू आहे. आरक्षण देणारे ही आंबेडकर होते व वाचविणारे ही आंबेडकरच आहे. आरक्षण वाचवायचा असेल तर संविधानाच्या बाजूने व आंबेडकरांच्या बाजूने उभे राहावे लागेल. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करत राजकारणी खेळ पाहत आहेत. आरक्षणाविषयी भूमिका मांडण्यासाठी सरकारने जेव्हा बोलवलं त्यावेळी तुम्ही गप्प बसतात. बैठकीला हजर राहत नाही. त्यांना केवळ प्रकाश आंबेडकरच हजेरी लावतात, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते (Utkarsha Rupwate) यांनी महाविकास आघाडीवरती जोरदार हल्लाबोल केला. तसेच राज ठाकरे (Raj Thackeray)
) यांनी तर जावई शोध लावला महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही असं वक्तव्य करणारे विद्वान आपल्या महाराष्ट्रात फिरतात असा खोचक टोला रुपवते यांनी ठाकरे यांना लगावलाय.
Bigg Boss Marathi: कोणी कसेही वागा पण छोटा पुढारी मात्र सगळ्यांशी प्रेमानेच वागणार; पाहा नवा प्रोमो
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढण्यात आली. मुंबईपासून सुरु झालेल्या या यात्रेचा छत्रपती संभाजीनगर मध्ये समारोप झाला. आरक्षणाच्या मुद्द्यावरून रूपवते यांनी महाविकास आघाडी वरती जोरदार निशाणा साधला. तसेच आरक्षण वाचवायचे असेल संविधानाच्या बाजूने तसेच प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने उभे राहण्याचे आव्हान देखील यावेळी रूपवते यांनी केले.
टाटांचं विमान, पावसाचा कहर अन् ब्रिटिशांचा पराभव.. हॉकी संघाच्या पहिल्या सुवर्णपदकाची स्टोरीही खास..
रुपवते म्हणाल्या, आरक्षण देणारे ही आंबेडकराच होते तर आरक्षण वाचविणारे ही आंबेडकरच आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. आरक्षणासंदर्भात सरकारने ज्यावेळेस चर्चेसाठी बैठकीसाठी बोलविले. त्यावेळेस विरोधी पक्षांनी गैरहजेरी लावली मात्र प्रकाश आंबेडकर हे एकटेच बैठकीला होते.
आमच्या राज्याचे माजी मुख्यमंत्री सांगताहेत की ओबीसी ना आरक्षण दिले पाहिजे तर मोदींना जाऊन सांगा आरक्षणाचा टक्का वाढवून द्या. त्यांना सांगण्या अगोदर आधी तुमची भूमिका स्पष्ट करा, कारण तुम्ही ही मोदी कडे जाऊनच परतलेले आहात अशा शब्दात नामो उल्लेख टाळत रूपवते यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
राज ठाकरे यांनी जावई शोध लावला
महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही असं वक्तव्य करणारे विद्वान आपल्या राज्यात फिरत आहे मात्र यांना सगळ्यांना उत्तर जायचं असेल तर ते म्हणजे आंबेडकरांच्या नेतृत्वात निघालेल्या या यात्रेला आपण सर्वांनी पाठबळ दिले पाहिजे. आरक्षण टिकवायचे असेल तर तुमच्याच हक्काचे खासदार आमदार हे पाठवले पाहिजे तरच आरक्षण टिकेल असं रूपवते यांनी म्हटले.