Uttam Jankar Criticized Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते सध्या मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर चांगलेच संतापल्याचे दिसत आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण राज्यात गाजत आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप होत आहेत. मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
पण, त्यांचा राजीनामा मागण्याची गरजच काय? त्यांनी स्वतःहूनच राजीनामा द्यायला हवा असे आमदार उत्तम जानकर म्हणाले आहेत. मात्र, यावेळी धनंजय मुंडे यांचा उल्लेख करताना जानकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. ज्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे. मी महिला वेश्या पाहिली होती मात्र पुरुष वेश्या पहिल्यांदाच पाहिली असे उत्तम जानकर म्हणाले आहेत.
जानकर पुढे म्हणाले, धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याची गरजच काय. खरंतर त्यांनीच राजीनामा दिला पाहिजे. त्यांचा पहिल्याच दिवशी राजीनामा घ्यायला हवा होता. गृहखातं जागं असतं, शुद्धीवर असत तर असं काही घडलं नसतं. गृहमंत्री आणि सरकारच्या आशीर्वादानेच राज्यात गुंडगिरी सुरू आहे. सरकार आणि वाल्मिक कराड यांच्यात तडजोडी होऊनच तो शरण गेला असा गंभीर आरोप आमदार उत्तम जानकर यांनी केला.
बीड प्रकरणाचे मास्टरमाइंड धनंजय मुंडेच, अजितदादा त्यांना संरक्षण का देताय?, संभाजीराजेंचा थेट सवाल
आधी हे राज्य अतिशय नैतिक राज्य होतं. मात्र आता ह्यांनी रान बाजारच मांडला आहे. मी महिला वेश्या पाहिली होती, मात्र पुरुष वेश्या असू शकतो असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यातील मंत्रीच जर असे वागत असतील आणि अजित पवार असे सरकार चालवत असतील तर राज्याने त्यांच्याकडून काय घ्यायचं असा सवाल आ. उत्तम जानकर यांनी केला.