Download App

‘लेकरांचं नाव घेऊन लहान भावाच्या ताटातलं काढाल तर..’; वडेट्टीवारांचा जरांगेंना थेट इशारा

  • Written By: Last Updated:

Vijay Wadettiwar : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिला. तर आता दुसरीकडे ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसींनी जोरदार विरोध सुरू झाला आहे. जालन्यात आज ओबीसी समाजाची आरक्षण बचाव एल्गार सभा झाली. या सभेतून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवा (Vijay Wadettiwar) यांनी जरांगे पाटलांवर जोरदार केली. लहान भावाच्या ताटातलं काढायचा प्रयत्न कराल, तर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.

Sunny Leone: वाराणसीला पोहोचली सनी लिओनी, गंगा आरतीत नोंदवला सहभाग 

मनोज जरांगे आणि मराठा समाजाच्या मागण्यांविरोधात ओबीसी नेत्यांनी दंड थोपाटले. आज सकल ओबीसी भटके विमुक्त जाती समाजाच्यावतीने अंबडमध्ये ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा झाली. या सभेला मंत्री छनग भुजबळ, जयदत क्षीरसागर, प्रकाश शेंडगे, आमदार महादेव जानकर, गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक ओबीसी नेते हजर होते. या सभेला संबोधित करतांना वडेट्टीवार म्हणाले, भर उन्हात पिवळं वादळ आलं. हे वादळ अनेकांना पिवळं केल्याशिवाय सोडणार नाही. ओबीसींच्या हक्काला धक्का लावण्याची कोणाची हिंमत होणार नाही, अशी ही सभा आहे. सवाल इस बात का नही, शिसा तुटा है की बचा है, सवाल इस बात का है की पत्थर किस तरफ से आया है.आम्ही ओबीसीच्या हक्कासाठी लढत असून आणि आम्हाला धमकी द्याल तर आम्ही आमच्या पदापेक्षा आमच्या समाजासाठी लढू. पद महत्वाचं नाही, तर समाज महत्वाचा आहे. सत्ता येते, जाते, कोणासोबत जगायचं हे महत्वाचं आहे, असं ते म्हणाले.

Aaradhya Bachchan: ‘लेकीच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्या अन् अभिषेकनं शेअर केली खास पोस्ट 

ते म्हणाले, ओबीसीतून आरक्षण मागणारे पिढ्यान पिढ्यांची जमीन कमी झाली. माझी लेकरं गरीब झाले, म्हणून सांगताहेत. तुमच्या जमिनी पिढीजात कमी झाली असतील, पण पिढ्यानपिढ्या ज्यांच्याकडे जमिनी नाहीत, त्यांची काय व्यथा असेल, याचा विचार तुम्ही करा. 20-50 एकराचा शेतकरी आज पाच एकरावर आला असेल, पण ज्यांच्याकडे दोन एकरही जमीन नसेल तो वीस पिढ्यांतही कुठे असेल? याचा विचार तुम्ही करणार की, नाही? तुम्ही स्वत:ला मोठा भाऊ म्हणता मग, मोठ्या भावाने मोठ्या भावासारखं वागावं. लहान भावाच्या ताटातलं काढायचा प्रयत्न कराल, तर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.

ओबीसीचं आरक्षण हे संवैधानिक आहे. सरकार आणि विरोधी पक्ष म्हणून आम्ही ती जबाबदारी पार पाडू. आमच्या जिवात जीव असेपर्यंत आम्ही आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, लेकरांचं नाव घेऊन लोकांना बनवू नका, ते लेकरं लेकरं आहेत, मग हे काय बकरं आहे कापून खाण्यासाठी, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला.

ओबीसी समाजाची मोदींना विनंती आहे की, एकदा जातनिहाय जनगणना करून टाका. मग कळेल, जितनी जिसकी संख्या भारी, उसकी हिस्सेदारी ज्यादा. जातनिहाय जनगणना झाली तर दुध का दुध और पाणी का पाणी हो जाएगा, असंही वडेट्टीवार म्हणाले.

follow us