Download App

….अन्यथा मी राजकारण सोडून देईल; युवकाच्या घरी सांत्वनपर भेट, पंकजा मुंडे ढसा-ढसा रडल्या

पंकजा मुंडे यांचा लोकसभेत पराभव झाल्यानंतर कार्यकत्यांनी टोकाचं आत्महत्येसारखं पाऊल उचलंल आहे. त्यावर पंकजा मंडेनाही अश्रू अनावर झाले आहेत.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Pankaja Munde : बीड लोकसभेची निवडणूकअत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये राष्ट्रावादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे विजयी झाले. तर, भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे पराभूत झाल्या. (Beed Lok Sabha) दरम्यान, त्यांचा पराभव झाल्याचा धक्का बसल्याने दोन कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यामुळे पंकजा मुंडे अस्वस्थ असल्याचं चित्र आहे. (Pankaja Munde) आज चिंचेवाडी येथील युवकाच्या घरी सांथवन करण्यासाठी पकंजा मुंडे आज गेल्या होत्या. यावेळी एकच कल्लोळ झाला. नातेवाईकांचा आक्रोश पाहून पंकजा मुंडे देखील ढसा-ढसा रडल्याचं पाहायला मिळालं.

आत्महत्या करू नका पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करा नाहीतर विरोधात मतदान.., ओबीसी कार्यकर्त्यांकडून भाजपला इशारा

पंकजा मुंडे चिंचेवाडी येथे असताना पुन्हा एका समर्थकाने लोकसभेतील पराभव जिव्हारी लागल्याने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. ही घटना बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील वारणी येथे आज घडली. गणेश (उर्फ) हरिभाऊ भाऊसाहेब बडे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. या अगोदरही दोन कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी मीडियाच्या माध्यमातून आत्महत्या करू नका असं आवाहन केलं होतं.

मी पराभव स्वीकारला

या घटना घडत असताना वारंवार पंकजा मुंडे या कार्यकर्त्यांना आवाहन करत आहेत. स्वतः च्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याचे माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही. मी लढत आहे संयम ठेवत आहे, तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने रहा. कोणी माझ्यासाठी जीव देणं कळतेय का किती कठीण आहे माझ्यासाठी? मला प्रचंड अपराधी आणि दु:खी वाटत आहे. मी पराभव स्वीकारला आणि पचवला आहे पराभव तुम्ही ही पचवा असं आवाहन त्यांनी केलं आहे.

पराभवाने खचून जाऊ नका प्रतिक्षा संपली!MHT CET;निकाल जाहीर, ‘या’ लिंकवर जाऊ पाहता येणार निकाल

लोकसभा निवडणुकीनंतर मुंडे या प्रथमच शहरात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत आपला पराभाव झाला असला तरी तुम्हीच आमच्या नेत्या आहात. अशी भावना याप्रसंगी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी मुंडे म्हणाल्या पराभवाने खचून जाऊ नका. अंधारानंतर प्रकाश असतो. तुम्ही माझ्यासाठी प्रकाश आहात. कार्यकर्त्यांनी भावनाविवश होऊन कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन त्यांनी केले.

follow us

वेब स्टोरीज