Download App

Pankaja Munde: पंकजा मुंडेंनी सांगितले शिवसेनेत जाण्याच्या ऑफरबद्दल…

बीड : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावं त्यांचा मान सन्मान केला जाईल, अशी ऑफर शिवसेनेकडून (Shiv Sena) देण्यात आलीय.

या ऑफरबद्दल पंकजा मुंडे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, अशा प्रकारच्या ज्या चर्चा सुरु आहेत, यावर वेगळी पत्रकार परिषद घेईन. आमच्यात काहीच खदखद नाही. चुकीच्या पद्धतीने चर्चा सुरु आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ज्या कार्यक्रमात असतात, तिथे पंकजा मुंडे नसतात. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये नेमके काय चालले? यावरून तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. त्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाष्य केले.

देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमाला आले त्या कार्यक्रमाला मी येण अपेक्षित होतं. आज आमचे प्रदेशाध्यक्ष आले तर मी देखील आले. जे पी नड्डा आले तेव्ही मी देखील आले होते. मी भाजपच्या संस्कारात वाढलेली आहे. त्यामुळे मी भाजपची सच्ची कार्यकर्ता आहे, असे मुंडे म्हणाल्या.

मी पक्षाचा आणि संघटनेचा प्रोटोकॉल पाळते. कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला किंवा पक्षाबाहेरीला कार्यक्रमाला जाणे मला कल्पसर नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) आणि खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) हे गेवराईत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Tags

follow us