Download App

पंकजांचा राजळे, प्रितम मुंडेंना दिलासा! मेळाव्यातून म्हणाल्या, कोणाचे हिसकावून खाणार नाही

Pankaja Munde : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे ह्या बीड लोकसभा किंवा इतर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. मात्र पंकजा मुंडे यांनी आज झालेल्या दसरा मेळाव्यातून मोठी घोषणा केली आहे. इतर कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

पंकजा मुंडे म्हणाल्या की कर्ज झालं, दुख: झालं, व्यसन लागलं तर बाप झाडाला लटकून आत्महत्या करतो पण आईला नवऱ्याने मारलं, सासरच्यांनी छळले, लेकरांनी लक्ष दिले नाही तरी जीव द्यावा वाटत नाही कारण त्या लेकरांमध्ये जीव अडकलेला असतो. मी नेत्यांपासून ताईसाहेबांपासून आता आईच्या भूमिकेत आहे. त्यांना न्याय देणं हे माझं कर्तव्य आहे. कोणा दुसऱ्यांच हाडपून खाणं हे माझं कर्तव्य नाही. ही सीट लढा, ती सीट लढा, प्रितमच्या जागेवरुन लढा हे असलं काहीच चालणार नाही. कारण मी कोणाच्या मेहनतीचे खाणार नाही. एकवेळ ऊस तोडायला जाईल, कापूस वेचायला जाईल पण स्वाभिमान गहाण टाकणार नाही, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

Pankaja Munde : ..अन् अचानक पंकजा मुंडेंचा माईक पडला बंद; सभेत नेमकं काय घडलं?

मी कधीही उतणार नाही, मातणार नाही, आणि घेतलेला वसा कधीही सोडणार नसल्याचा निर्धार भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा‎‎ आज पाटोदा तालुक्यातील राष्ट्रसंत भगवान‎‎बाबा यांची जन्मभूमी असलेल्या ‎‎सावरगाव घाट येथील भगवान ‎‎भक्तीगडावर झाला. यावेळी त्यांनी आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली. मी राजकारणात पुन्हा सक्रिय होत असल्याचे संकेत त्यांनी दिले. इतकेच नाही तर दुसऱ्या कोणत्याच मतदार संघातून निवडणूक लढवणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags

follow us