Download App

Parbhani Violence संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर शहरात दंगल, 8 गुन्हे दाखल, 50 जणांना अटक…

Parbhani Violence:गेल्या दोन दिवसांत शहरातील विविध पोलिस ठाण्यात एकूण आठ गुन्हे दाखल झालेत. तर एकूण 50 जणांना अटक करण्यात आली.

  • Written By: Last Updated:

Parbhani Violence: परभणी (Parbhani) शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्यासमोर संविधान शिल्पाची (Constitution Craft) एका माथेफिरूने विटंबना केली होती. त्यानंतर बुधवारी अख्खं परभणी शहर धुसमसले. सलग दोन दिवसांच्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर शहरातील वातावरण निवळले आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत शहरातील विविध पोलिस ठाण्यात एकूण आठ गुन्हे दाखल झालेत. तर एकूण 50 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप (Shahaji Umap) यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

‘भेटवस्तू नको, फक्त Google Pay करा’, शर्माचींजी मुलगी अन् गोपालजींच्या मुलाची लग्नपत्रिका व्हायरल 

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याची घटना मंगळवारी (दि. 10) सायंकाळी घडली. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटक केली. घटनेनंतर त्याच दिवशी सायंकाळी उशिरा मोठा जमाव पुतळा परिसरात दाखल झाला होता. घटनेच्या दुसऱ्या दिवशी (बुधवारी) बंद पुकारण्यात आला होता. दुपारपर्यंत हा बंद शांततेत सुरू होता. मात्र दुपारनंतर या बंदला मोठ्या प्रमाणात हिंसक वळण लागले. घटनेच्या दुसऱ्या दिवशी संतप्त जमावाने शहरातील बाजारपेठेत घुसून तोडफोड केली.

‘भेटवस्तू नको, फक्त Google Pay करा’, शर्माचींजी मुलगी अन् गोपालजींच्या मुलाची लग्नपत्रिका व्हायरल 

दरम्यान, आता या प्रकरणी एकूण आठ गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्यात संविधानाच्या प्रतिकृतीचा अपमान करणाऱ्या इसमाविरुध्दच्या गुन्ह्याचाही समावेश आहे. बंददरम्यान तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनाही समोर आल्या आहेत. आतापर्यंत एकूण 50 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये 41 पुरुष आणि नऊ महिलांचा समावेश आहे. दुकानांचे फलक तोडणे, शहरातील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे अशा विविध कलमान्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिवाय या तोडफोडीच्या घटनांचे व्हिडीओ सीसीटीव्हि फुटेज तपासूनपुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस महासंचालक उमाप यांनी सांगितलं.

दरम्यान, विटंबनेच्या या घटनेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान करण्याची हिंमत होतेच कशी? असा संतप्त सवाल खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.
तसेच हा कट सुनियोजित तर नव्हता ना, या प्रकरणामागे कोणी मास्टरमाईंड आहे का? याची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली.

 

follow us