Download App

Prakash Shendage : ‘तुमच्याकडे आंदोलनासाठी 10 लाख गाड्या, तर आमच्याकडे 2 हजार गाढवं-मेंढरं’

  • Written By: Last Updated:

Prakash Shendage : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. सरकारला अल्टिमेटम देऊनही आरक्षणाबाबत कुठलीही कार्यवाही झाली नाही. तरीही मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, आता जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असून त्यासाठी तीन कोटी मराठे मुंबईत जाणार आहेत. तर ओबीसी समाजानेही आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. तेही 20 जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करणार आहेत. मराठा समाजाकडे आंदोलनासाठी 10 लाख गाड्या असतील तर आमच्याकडे 2 हजार गाढवं-मेंढरं तयार आहे, आम्हीही आझाद मैदानावर आंदोलन करणार, असं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendage) म्हणाले.

Ranbir Kapoor : सक्सेस पार्टीत अभिनेत्रीला किस केल्यावरून ट्रोल; म्हणाले, ’14 वर्षांनी लहान…’ 

नांदेड जिल्ह्यातील नायगाव नरसी येथे रविवारी (दि. 8 जानेवारी) रोजी ओबीसी समाजाची ओबीसी आरक्षण बचाव मेळावा झाला. यावेळी मेळाव्याला संबोधित करतांना शेंडगे यांनी मनोज जरांगेवर मुंबईत होत असलेल्या आंदोलनावरून जोरदार टीका केली. ते म्हणाले, 3 कोटी मराठा, 10 लाख गाड्या, 1000 कोटींचे डिझेल खर्च करून गरीब मराठा समाज आक्षणासाठी मुंबईला आंदोलन करणार आहे. गरीब मराठ्याचं आंदोलन हे आरक्षणासाठी नसून ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आणण्यासाठी आहे. आमचे आरक्षण धोक्यात आणण्यासाठी तुम्ही आंदोलन करणार असाल तर आम्हीही आरक्षण वाचवण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहोत. तुमच्याकडे 10 लाखांच्या गाड्या असतील, तर आमच्याकडेही हजारो गाढवे, डुक्कर, मेंढ्या आहेत आणि आम्ही त्यांना घेऊन आझाद मैदानावर आंदोलन करू, असे प्रकाश शेंडगे म्हणाले.

Golden Globe: ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार सोहळ्यात ‘या’ सिनेमांनी मारली बाजी! पाहा विजेत्यांची यादी… 

या मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, माजी खासदार विकास महात्मे, प्रा. टी.पी.मुंडे, सचिन नाईक, अविनाश भोसीकर, महेंद्र देमनगुंडे यांच्यासह ओबीसी समाजाचे नेते उपस्थित होते.

दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष सुरू आहे. मनोज जरांगेंनी ओबीसी समाजातून आरक्षणाची मागणी केली, तर ओबीसी समाजाकडून त्यांच्या मागणीला विरोध आहेत. आता मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलनाचा इशारा दिला आहे. 20 जानेवारीला जरांगे हे लाखो मराठा बांधवांसह अंतरवली सराटीहून मुंबईकडे रवाना होणार आहेत.

तर २० जानेवारीपासून ओबीसी समाजही याच मैदानावर आंदोलन करणार आहे. आम्ही आधी जमिनीची मागणी केली आहे. ३ कोटी मराठा आंदोलकांसाठी हे मैदान कमी पडणार आहे, तेव्हा सरकारने त्यांना दुसरे मैदान द्यावे,अस शेंडगे म्हणाल्या.त्यामुळं आझाद मैदानावरूनही या दोन समाजात वाद होण्याची चिन्ह आहेत.

follow us