सभा होते तेव्हा 200 जेसीबीतून फुले उधळतात, अशी गरीबी आम्हालाही हवी; प्रकाश शेंडगेंचा जरांगेंना टोला

सभा होते तेव्हा 200 जेसीबीतून फुले उधळतात, अशी गरीबी आम्हालाही हवी; प्रकाश शेंडगेंचा जरांगेंना टोला

Prakash Shendage : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सरकारला अल्टिमेटम दिला होता. मात्र, अल्टिमेटम संपूनही राज्य सरकारने कोणताही कार्यवाही केली नाही. त्यामुळं जरांगेंनी मुंबईत २० जानेवारीपासून उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यातील तीन कोटी मराठे मुंबईत जाणार आहेत. दरम्यान, आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendage) यांनी जरांगेच्या सभेत होणारी पुष्पवृष्टी, जरांगेच्या गाड्यातील ताफा यावर भाष्य करत अशी गरीबी आम्हाला मिळू दे, असा टोला लगावला.

भाजपमध्ये ब्राह्मणांवर अन्याय होतोय का ? सुनील देवधरांचे थेट उत्तर 

आज पंढरपुरात ओ.बी.सी भटके विमुक्त एल्गार महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ, आमदार महादेव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे यांच्यासह राज्यातील प्रमुख ओबीसी नेते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शेंडगे म्हणाले की, राज्यातील तीन कोटी मराठे मुंबईत उपोषण करणार आहेत. त्यांच्या दहा लाख गाड्यांसाठी कोट्यावधी रुपयांचं पेट्रोल-डिझेल लागले. मराठा समाजाची सभा होते तेव्हा 200 जेसीबीमधून फुले उधळली जातात. हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येते. असा एक गरीब मराठा समाज मुंबईत येऊन आंदोलन करणार आहे. आज आम्ही पंढरपूरमधून पांडुरंगाला साकडं घालतो की, अशी गरीबी आम्हालाही मिळू दे, असा टोला त्यांनी लगावला.

“जुन्या जखमा अजून विसरलेलो नाही…” : संभाजीराजे छत्रपतींकडून लोकसभेचे पिक्चर क्लिअर! 

शेंडगे म्हणाले की, गेल्या 75 वर्षात फक्त मराठा समाजाचे नेतेच आमदार आणि खासदार झाले. मुख्यमंत्री आणि मंत्री झाले. या लोकांनी मराठा समाजावर गरिबी आणली. ओबीसींनी मराठा समाजाला आत्महत्या करण्यास भाग पाडलेले नाही. मराठा नेत्यांच्या धोरणामुळेच त्यांच्यावर ही वेळ आली, असंही जरांगे म्हणाले.

यापुढे आमदार, खासदार आपलेच
मराठा समाज छगन भुजबळांना मतदान करणार नाही, ते कसे निवडून येतात तेच पाहतो, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला होता. त्यावरही शेंडगेंनी भाष्य केलं. ते म्हणाले की, एक भुजबळ पाडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही निवडणुकीत 160 मराठे पाडू. एक-दोन अपवाद वगळता या जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी मराठा समाजाचे आहेत. यापुढे आमदार, खासदार आपलेच झाले पाहिजेत. यंदा माढ्यातून ओबीसींचाच खासदार निवडून पाठवायचा आहे. त्यासाठी जीवाचे रान करू, आणि ओबीसी खासदार लोकसभेत पाठवू असं शेंडगे म्हणाले.

शेंडगे म्हणाले, मराठा समाजाच्या शिंदे समिताची जीआर रात्री अडीच वाजता काढला जातो. म्हणून रात्री-बेरात्री आमचा घात होऊ नये म्हणून आपल्याला २० तारखेला आंदोलन सुरू करावं लागले. रात्र वैऱ्याची आहे. सावध राहणं गरजेचं

भुजबळ काय म्हणाले?
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. पण मराठा समाजाला 10, 12 किंवा 15 टक्के वेगळे आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी होत आहे. मात्र, मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळणार नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube