Assembly Monsoon Session 2023 : अमृतमोहोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्यातील 75 महत्वाचे प्रश्न काढा. ते 75 प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजूरी देऊन त्यासाठी तरतूद करा. नुसते स्मारक बांधून भागत नाही. मराठवाड्याच्या अनुशेष भरुन काढण्यासाठी काही तरी निर्णय झाला पाहिजे. सरकारने हा निर्णय घेतला तर अमृतमोहोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्याला फायदा होईल, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधान सभेत केली.
ते पुढं म्हणाले की 17 सप्टेंबर 2022 पासून मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृतमोहोत्सवी वर्षाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की चार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पण मुख्यमंत्र्यांना आठवण करुन द्यायची आहे की महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार यांनी 75 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात घोषणा केली होती. त्यावेळी आठ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्याची एक कमिटी स्थापन केली होती. आता तुम्ही पुढाकार घेऊन मराठवाड्याच्या प्रश्नसंदर्भात मराठवाड्यातील सर्व पक्षीय आमदारांची बैठक घ्या. मराठवाड्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, असे अशोक चव्हाण म्हणाले.
Uddhav Thackeray : ‘इतराचं राजकारण डावपेचाच, अजितदादांकडूनच योग्य न्याय मिळेल’
ते पुढं म्हणाले की मराठवाड्यात सिंचन, शाळा, कॉलेज, रोजगार, आरोग्य असे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न एका वर्षात सर्व प्रश्न सुटणार नाहीत पण निधी उपल्बध करुन दिला तर येत्या काही वर्षात अनेक प्रश्न मार्गी लागतील, असे अशोक चव्हाण म्हणाले.
अमृतमोहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मराठवाड्याचा इतिहास आणि वारसा जपला जावा, येणाऱ्या पिढ्यांना माहिती व्हावा यासाठी डॉक्युमेंटरी किंवा चित्रपट काढा. जसा तुम्ही धर्मवीर काढला, तुमचा जीवनप्रवास दाखवला. आनंद दिघेंचे नाव असले तरी आपलाच जास्त प्रवास दाखवला, अशी मागणी करत अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लागवला.