Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. भरधाव वेगातील वाहने (Road Accident) अनियंत्रित होऊन अनेकदा अपघात होतात. आताही भीषण अपघाताची बातमी बीड जिल्ह्यातून (Beed Accident) आली आहे. मांजरसुंबा-पाटोदा महामार्गावर कंटेनर आणि पिक अप वाहनाचा अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये कंटेनर चालकासह अन्य एक जणाचा समावेश आहे. या अपघाताची माहिती मिळताच नेकनूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहनांतील मृतदेह बाहेर काढले तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या अपघातानंतर महामार्गावर बराच काळ वाहतूक खोळंबली होती. यानंतर बराच वेळेनंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
Road Accident : भीषण अपघात! भरधाव वेगातील ट्रक हॉटेलात घुसला; तिघांचा जागीच मृत्यू
रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे.