Download App

Road Accident : भीषण अपघात! ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत तिघे जागीच ठार

Road Accident : राज्यातील रस्ते अपघातांची संख्या काही केल्या (Road Accident) कमी होत नाही. रोजच अपघातात होत असून लोक मृत्यूमुखी पडत आहेत. आताही पुन्हा असाच भीषण अपघात झाला आहे. जालना येथील बदनापूर येथ छत्रपती संभाजीनगर-जालना रोडवर एका ट्रॅक्टर आणि मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एका 15 वर्षीय मुलाचाही समावेश आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

Aus VS Pak : कांगारूंनीही पाकला धुतलं; 62 धावांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलियाची चौथ्या स्थानी झेप

याबाबत आधिक माहिती अशी, जालना-छत्रपती संभाजीनगर रोडवर येत असलेली दुचाकी आणि ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा चक्काचूर झाला. तर तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांनाही देण्यात आली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सध्या रस्ते अपघातांची संख्या वाढली आहे. वाहनचालकांकडून वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्याने वारंवार अशा घटना घडू लागल्या आहेत.

रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातातही असेच घडले होते. गौरी गणपतीच्या सणासाठी कुटुंब पुण्याहून अमरावतीकडे निघाले होते. समृद्धी महामार्गावर असताना अचानक वन्यप्राणी आडवा आला. या प्राण्याचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात कार तीन वेळा पलटी झाली. कारची वेगात होती. त्यामुळे वेगातच पलटी झाली. या अपघातात कुटुंबातील महिला ठार झाली. तर अन्य तीन प्रवासी जखमी जखमी झाले. या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे.

Road Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! 12 जणांचा मृत्यू, 23 जखमी

रस्त्याच्या कडेला पायी (Road Accident) जाणारी माणसेही असतात. गाव किंवा रहदारीचा परिसर आला की वाहनाचा वेग मर्यादित करणे आवश्यक असते. तसेच रस्त्याच्या कडेला कुणी आहे का हे देखील चालकांना पहावे लागते. मात्र, बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष होते. अंतर लवकर पार करण्याच्या नादात अपघात घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देण्याची आणि वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज आहे.

Tags

follow us