Road Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! 12 जणांचा मृत्यू, 23 जखमी
Road Accident : समृद्धी महामार्गावर काही केल्या अपघात (Road Accident) थांबण्याचे नाव घेत नाही. आताही या महामार्गावर (Samruddhi Highway) भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दहा ते बारा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. जवळपास 23 जण जखमी झाले असून यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. समृ्द्धी महामार्गावर वैजापूर येथील अगरसायगाव परिसरात रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
जरांगेंच काही नाही, सरकारमधील लोकांनीच वणवा पेटवला; पटोलेंचा घणाघात
याबाबत आधिक माहिती अशी, नाशिक येथील इंद्रानगर येथे राहणारे जवळपास 35 भाविक खासगी टेम्पो ट्रॅव्हलरने बुलढाणा येथील बाबा सैलाणीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना समृद्धी महामार्गावर अगरसायगाव परिसरात त्यांच्या वाहनाला अपघात झाला. समृद्धी महामार्गावरील एका टोलनाक्यावर एक ट्रक बाजूला घेतला जात होता. त्याचवेळी येत असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की मिनी बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला.
या दुर्घटनेत बारा जणांचा मृत्यू झाला. अपघातातील मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. तर 23 जण जखमी झाले. या जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर येथे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी मदतकार्य करत वाहतूक कोंडी दूर केली. स्थानिक नागरिकांनीही पोलीस प्रशासनाला मदत केली. यानंतर जखमींसाठी रुग्णवाहिका बोलावून त्यांना दवाखान्यात हलविण्यात आले.
Road Accident : ‘समृ्द्धी’वर भीषण अपघात! भरधाव कार दुभाजकाला धडकली, एक ठार
समृद्धी महामार्गावर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातातही असेच घडले होते. गौरी गणपतीच्या सणासाठी कुटुंब पुण्याहून अमरावतीकडे निघाले होते. समृद्धी महामार्गावर असताना अचानक वन्यप्राणी आडवा आला. या प्राण्याचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात कार तीन वेळा पलटी झाली. कारची वेगात होती. त्यामुळे वेगातच पलटी झाली. या अपघातात कुटुंबातील महिला ठार झाली. तर अन्य तीन प्रवासी जखमी जखमी झाले. या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे.