जरांगेंच काही नाही, सरकारमधील लोकांनीच वणवा पेटवला; पटोलेंचा घणाघात

  • Written By: Published:
जरांगेंच काही नाही, सरकारमधील लोकांनीच वणवा पेटवला; पटोलेंचा घणाघात

Nana Patole : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीवरून सरकारला नाकेनऊ आणणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आज अंतरवली सराटी गावात विराट सभा झाली. या सभेच्या आधी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरागेंना अटक करण्याची मागणी केली होती. याबाबत त्यांनी गृहखात्याला पत्र लिहिलं होतं. यावर आता कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) भाष्य केलं. सरकारमधील लोकांनीच हा वणवा पेटवला, अशी टीका त्यांनी केली.

World cup 2023 : 24 वर्षांनंतर भारत-पाक सामन्यात दुसऱ्यांदा गोलंदाज ठरला सामनावीर 

सदावर्तेंनी गृहखात्याला लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं की, मनोज जरांगे पाटलांची अंतरवली सराटी येथे होणारी सभा हिंसक होईल. सभेला परवनागी देऊ नका, जरागेंना तातडीने अटक करा, अशी मागणी केली होती. त्यानंतर आजच्या सभेत बोलतांना जरांगे पाटलांनी सदावर्तेंवर जोरदार टीका केली होती. तसंच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेच मराठा समाजाला उचकावत असल्याचा आरोप केला होता. या सगळ्या घडामोडीनंतर आज पटोलेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

माध्यमांशी बोलतांना पटोले म्हणाले की, सत्तेत येण्यासाठी भाजपनेच मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटवला आहे. आता सरकारमधील लोकांनाच प्रश्न विचारले पाहिजेत. जरांगे पाटील काय बोलतात, हा मुद्दाच नाही. सरकारमधील लोकांनीच हा वणवा पेटवला आहे. आणि आता त्यांनीच हा वणवा थांबवला पाहिजे, ही आमची भूमिका आहे असं पटोले म्हणाले.

तर काल पटोलेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्दावरूच भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. भाजपने निवडणूका जिंकण्यासाठी जी काटेरी बीजे पेरली होती तीच आता बाहेर येत आहेत. 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाने मराठा समाजाला आरक्षण देऊ असं सांगितलं होतं. नंतर 2014 मध्ये र राज्यात आणि केंद्रातही भाजपचे सरकार आले. मात्र, मराठा समाजाला 2019 पर्यंत झुलवत ठेवल होतं. भाजपचं सरकार असतांना मराठा समाजला मोर्चे काढावे लागले होते, अशी टीका पटोलेंनी केली होती.

दरम्यान, गेल्या महिन्याभरापासून जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढत आहे. दीर्घकाळ त्यांनी अंतवली सराटी गावात उषोषणही केलं. त्यांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली. त्यांनी आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी चाळीस दिवसांची मुदत मागितली होती. त्यानंतर जरांगेंनी उपोषण मागे घेतलं. मात्र, अद्यापही सरकारने मराठा आरक्षणाच प्रश्न मार्गी लावला नाही. त्यामुळं जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. आपल्या मागण्यावर ते ठाम आहेत. मात्र, ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, ही भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली. त्यामुळं सरकारची चांगलीच कोंडी झाली. त्यामुळं आता सरकार मराठा आरक्षणासंदर्भात काय निर्णय घेतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube