World cup 2023 : 24 वर्षांनंतर भारत-पाक सामन्यात दुसऱ्यांदा गोलंदाज ठरला सामनावीर

World cup 2023 : 24 वर्षांनंतर भारत-पाक सामन्यात दुसऱ्यांदा गोलंदाज ठरला सामनावीर

IND vs PAK : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने चमकदार कामगिरी केली. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानचा डाव 42.5 षटकांत 191 धावांत गुंडाळला. यानंतर रोहित शर्माची 86 धावांची तुफानी खेळी आणि श्रेयस अय्यरच्या 53 धावांच्या खेळीच्या जोरावर जवळपास 20 षटके शिल्लक असताना सामना जिंकला.

जसप्रीत बुमराहला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. त्याने 7 षटकांत 19 धावा देत 2 बळी घेतले. महंमद रिझवान आणि शादाब खान यांना 3 चेंडूत पॅव्हेलियनमध्ये पाठवून त्याने पाकिस्तानला अशा टप्प्यावर नेले की तेथून कमबॅक करणे शक्य नव्हते. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 8 सामने झाले आहेत. भारताने 8 वेळा विजय मिळवला आहे. गोलंदाजीचा सामनावीर ठरण्याची ही दुसरी वेळ होती. यापूर्वी 24 वर्षांपूर्वी 1999 मध्ये ही घटना घडली होती.

पाकिस्तानचे कंबरडे मोडले अन् बुमराहची टॉप गोलंदाजांच्या लिस्टमध्ये धडक

सचिन तेंडुलकर सर्वाधिक वेळा सामनावीर ठरला
व्यंकटेश प्रसाद 1999 मध्ये सामनावीर ठरला होता. मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात व्यंकटेश प्रसादने 9.3 षटकात 27 धावा देत 5 बळी घेतले. भारताने हा सामना 47 धावांनी जिंकला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सर्वाधिक वेळा पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषकात सामनावीर ठरला आहे. सचिनला 1992, 2003 आणि 2011 मध्ये सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

World Cup 2023 : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, रोहित शर्मा, श्रेयस अय्यरची धुव्वाधार खेळी

भारत-पाकिस्तान विश्वचषक सामन्यात सामनावीर कोण-कोण ठरले?
माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू 1996 च्या विश्वचषकात सामनावीर, 1999 मध्ये व्यंकटेश प्रसाद, 2015 मध्ये विराट कोहली, 2019 मध्ये रोहित शर्मा आणि 2023 मध्ये जसप्रीत बुमराह हा सामनावीर ठरला होता. भारत आणि पाकिस्तान 1992 मध्ये वनडे वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा आमनेसामने आले होते. यानंतर 9 विश्वचषकात दोघेही 8 वेळा आमनेसामने आले. 2007 मध्ये दोघांमध्ये लढत झाली नव्हती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube