सासू सुनेचं अनोख प्रेम! सासूचं निधन झाल्याच कळता सुनेचाही मृत्यू, छत्रपती संभाजीनगरातील घटना

दोघीही विद्यापीठाचे माजी सुरक्षा अधिकारी सुरेश परदेशी यांच्या आई आणि पत्नी होत्या. रुक्मिणीबाई यांच्यावर नाशिक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

News Photo   2025 11 05T150250.880

News Photo 2025 11 05T150250.880

छत्रपती संभाजीनगरच्या वेदांतनगर परिसरात काल मंगळवार (दि. 4 नोव्हेंबर)रोजी हृदयद्रावक घटना घडली. (Rahul Gandhi) शंभरीच्या उंबरठ्यावर असलेल्या रुक्मिणी रूपचंद परदेशी यांचं निधन झालं. याच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतल. पण सर्वांना धक्का तेव्हा बसला जेव्हा सासूच्या निधनाची बातमी कळल्यानंतर सून विजया परदेशी यांनी देखील वयाच्या 62 व्या वर्षी अखेरचा श्वास घेत.

दोघीही विद्यापीठाचे माजी सुरक्षा अधिकारी सुरेश परदेशी यांच्या आई आणि पत्नी होत्या. रुक्मिणीबाई यांच्यावर नाशिक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले, तर विजया परदेशी यांच्यावर बुधवारी दुपारी पुष्पनगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. मंगळवारी शहरातील वेदांत नगर परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली. सासूच्या मृत्यूची बातमी मिळताच त्यांच्या सुनेचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

राहुल गांधींनी दावा केलेली, हरियाणात 10 बुथवर 22 वेळा मतदान करणारी ब्राझीलची मॉडेल कोण?

रुक्मिणी रूपचंद परदेशी या दिवळीच्या सुट्टीत भावाला भेटण्यासाठी नाशिक येथे गेले होते. तेव्हा दुपारी घरी बसलेले असताना रुक्मिणी रूपचंद परदेशी यांचं निधन झाल्याची बातमी कळल्यानंतर कुटुंबातील सदस्य नाशिकच्या दिशेने निघण्याची तयारी करत होते. सासूच्या निधनाची बातमी कळल्यानंतर सून विजया यांना हृदयविकाराचा झटका आला. अशात त्यांना लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत फार उशीर झालेले होता. रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं.

सुसूच्या निधनाती बातमी समोर आल्यानंतर सूनेला मोठा धक्का बसला. कारण दोघींमध्ये आई – लेकीसारखं नातं होतं… अशात एकाच दिवशी सासू आणि सूनेचं निधन झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, रुक्मिणी आणि विजया यांमध्ये असलेलं नातं इतर सासू – सुनांसाठी एक उत्तम उदाहरण आहे. कारण एकीकडे हुंडाबळी आणि इतर कारणांमुळे सुनांची हत्या आणि आत्महत्या होत आहे. तर दुसरीकडे रुक्मिणी यांनी सासरी सून विजया यांचा आईसारखं प्रेम दिलं.

Exit mobile version