छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेले आहे. या निर्णयाला केंद्र सरकारने मंजूरी दिल्याने अधिकृतपणे आता सरकारी कार्यालय व इतर सार्वजनिक ठिकाणी संभाजीनगर नावाचा उल्लेख केला जात आहे. पण यानिर्णयाच्या विरोधात संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील हे आंदोलन करत आहेत. त्यांच्या या निर्णायाला पाठिंबा म्हणून एक युवक थेट लग्न झाल्यानंतर या आंदोलनस्थळी दाखल झाला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून संभाजीनगरचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे औरंगाबाद नामांतराच्या विरोधात आंदोलन करत आहेत. त्यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. त्याला समर्थन देण्यासाठी एक युवक लग्न झाल्यानंतर थेट या आंदोलनाच्या जागेवर आला आहे. यावेळी त्याच्या अंगावर लग्नाचा ड्रेसही तसाच होता. एवढेच नाही तर त्याने गळ्यातील लग्नाचा हार देखील काढलेला नव्हता.
यावेळी त्या युवकाने बोलताना जास्तीत जास्त लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे. तसेच या शहराचे नाव औरंगाबाद होते व औरंगाबाद राहील, असेही त्याने सांगितले. यावेळी अनेकजण या आंदोनलस्थळी उपस्थित होते. याआधी दोन दिवसांपूर्वी या आंदोलनाच्या मंडपामध्ये औरंगजेबाचा फोटो लावण्यात आला होता. त्यावरुन देखील बरेच वादंग उठले होते.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या छत्रपती संभाजीनगर या नामांतराल विरोध केला आहे. यावरुन राज्यातील शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी जलील यांच्यावर निशाणा साधला आहे. जलील हे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत आहेत, असा सत्तार म्हणाले आहेत. तसेच हा निर्णय कोणत्याही एका व्यक्तीचा नसून हा सरकारचा निर्णय असल्याचे सत्तार म्हणाले आहेत.
Amitabh Bachchan यांना या आधीही झाली होती दुखापत, वाचा किस्सा…
दरम्यान जलील यांच्यावर ठाकरे गटाचे नेते चंद्राकंत खैरे यांनी देखील टीका केली आहे. जलील हे मुस्लीमांची मते मिळवण्यसाठी असे आंदोलन करत असल्याचे खैरेंनी म्हटले आहे. तर भाजपने आज संभाजीनगर येथे जलील यांच्या आंदोलनाच्या विरोधात आपले आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Adani Share Price : अदानीच्या शेअर्सच्या किंमतीत वाढ, LIC चे काय झाले ?