Download App

काय भाषणं करायचे? पण मंत्रीपद अन् ‘हरहर मोदी’…; संदीप क्षीरसागरांचा धनंजय मुंडेंवर निशाणा

Sandip Kshirsagar on Dhananjay Munde : राष्ट्रवादीमध्ये बंड करून भाजपसोबत सत्तेत सामील झालेल्या कुणाचीही भाषणंचं पाहावी वाटत नाहीत. एका महिन्यापूर्वी हे लोक कसे भाषणं करायचे? हातवारे करायचे. तुम्ही जे निवडून आलात ते पवारसाहेबांच्या पुरोगामी विचारवर निवडून आले आहात. पण त्यांना जसं मंत्रीपद मिळालं तसं हे लोक हरहर मोदी करायला लागले. असं म्हणत बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. (Sandip Kshirsagar Criticize Dhananjay Munde for leave NCP gone in power with BJP )

आम्ही राज्यातील अनेक नेत्यांच्या महिलांचे फ्लाइंग किस पाहिलेत; राऊतांचं विधानानं वाद उफळणार

अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करून भाजपसोबत सत्तेत गेल्या नंतर त्यांच्यासोबत अनेक नेते आणि कार्यकर्ते गेले आहेत. तर शरद पवारांसोबत देखील अनेक नेते आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या मतदारसंघामध्ये दोन गट पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. तशीच परिस्थिती बीड मतदारसंघामध्ये असेलेले आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटामध्ये आहेत. तर परळी मतदारसंघाचे राष्ट्रवादी आमदार धनंजय मुंडे मात्र अजित पवारांसोबत जात त्यांना मंत्रीपद मिळालं आहे. त्यामुळे त्यांच्यावर शरद पवार गटाकडून टीका होत आहे. यावेळी बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.

Ved Movie : रितेश-जिनीलियाच्या वेडचा नवा विक्रम; अनोख्या रेकॉर्डची गिनीज बुकमध्ये नोंद

काय म्हणाले संदीप क्षीरसागर?

राष्ट्रवादीमध्ये बंड करून भाजपसोबत सत्तेत सामील झालेल्या कुणाचीही भाषणंचं पाहावी वाटत नाहीत. एका महिन्यापूर्वी हे लोक कसे भाषणं करायचे? हातवारे करायचे. तुम्ही जे निवडून आलात ते पवारसाहेबांच्या पुरोगामी विचारवर निवडून आले आहात. पण त्यांना जसं मंत्रीपद मिळालं तसं हे लोक हरहर मोदी करायला लागले. या लोकांमध्ये आणि पक्षात कित्येक वर्ष निष्ठेने राहणाऱ्या लोकांमध्ये किती फरक आहे. असं म्हणत बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.

बंडानंतर शरद पवारांनी येवल्यात सभा घेतली कोणतीही यंत्रणा तेथे नसताना कित्येक लोकांनी मोठ्या संख्येने तेथे गर्दी झाली होती. त्यानंतर पवार साहेबांचे विचार आगामी काळात सर्वत्र पुन्हा पसरवण्यासाठी बीड जिल्हा हे ठिकाणं निवडण्यात आलं आहे. त्यासाठी 17 ऑगस्टला बीडमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची सभा होणार आहे. त्यासाठी तेथे हजर राहण्याचं अवाहन बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलं आहे.

Tags

follow us