Download App

‘अहवाल चुकीचा असेल तर…’; आमदार संजय शिरसाटांचा सुनील केंद्रकरांना इशारा

  • Written By: Last Updated:

Sanjay Shirsat On Sunil Kendrekar : कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, शासनाकडून नुकसान भरपाई न मिळणे, पिकाला रास्त भाव नसणं अशा कारणांमुळे शेतकरी आत्महत्यांचे (Farmer suicides) प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील दहा लाख शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले. एक लाखांहून अधिक शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार करत असल्याची अहवाल त्यांनी सरकार दिला आहे. याचे पडसाद अधिवेशनातही उमटले. यावरूनच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. हा अहवाल खोटा ठरला तर सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असं शिरसाट म्हणाले. (Sanjay Shirsat On Sunil Kendrekar Over Farmer suicides report)

अवकाळी पाऊस, शेतीचे नुकसान आणि आर्थिक विवंचना या गर्तेत अडकलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावर अनेक प्रयत्न झाल्याचा दावा आता फोल ठरत आहे. कारण, नुकताच मराठवाड्यातील शेतकरी प्रचंड नैराश्यात असल्याचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात केंद्रेकर यांनी अनेक शिफारशी केल्या आहेत. दरम्यान, आज औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलताना आमदार शिरसाटांना केंद्रेकरांच्या अहवालाविषयी विचारले असता ते म्हणाले, सुनील केंद्रेकर यांनी अत्यंत चुकीचा अहवाल दिला आहे. त्यांनी दिलेल्या अहवालामुळे डोक्यात संताप गेला आहे. या अहवालाची चौकशी करा, अशी मी मुख्यमंत्र्यांना मागणी केली. जर तो खरा असेल तर त्यानुसार कारवाई झाली पाहिजे. आणि जर हा अहवाल चुकीचा असेल, तर त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा, असं शिरसाट म्हणाले.

Manipur Violence: मणिपूर घटनेवर आण्णा हजारेंचा संताप, केली दोषींना फाशीच्या शिक्षेची मागणी 

विभागीय आयुक्त म्हणून तुमची काही जबाबदारी नव्हती का? नोकरी गेल्यावर पोपटासारखे काय बोलता? शेतकरी कसा उभा राहिल, याकडे लक्ष द्या. शेतकरी आत्महत्या कसे करतात, याकडे तुमचं लक्ष आहे का? असा सवालही शिरसाट यांनी केला. ते राजकारण्यांसारखी विधाने आणि अहवाल देत आहेत. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल. शेतकऱ्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणारा अहवाल असेल तर निश्चित कारवाई करायला लावणार. अहवाल चुकीचा असेल अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला जाईल. असं शिरसाट यांनी सांगितलं.

कृषी आत्महत्या प्रकरणी अहवाल दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यावर ED कारवाई सुरू असल्याची माहितीही शिरसाट यांनी दिली.

Tags

follow us

वेब स्टोरीज