Download App

Aashadhi Vari 2023 : संत एकनाथ अन् तुकारामांच्या पालखीचं आज पंढरीकडे प्रस्थान; देहू-पैठणनगरी दुमदुमली

Aashadhi Vari 2023 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला येत असतात. यामध्ये अनेक मानाच्या पालख्या देखील राज्यभरातून पंढरपूर नगरीत दाखल होत असतात. यामध्ये शेगावच्या गजानन महाराजांची पालखी, आळंदीची संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी, देहूची जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी, पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखी यांचा समावेश असतो. त्यातील संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आणि पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पालखीच्या प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात देहू आणि पैठणनगरी दुमदुमल्याचं पाहायला मिळालं. अबाल वृद्धांपर्यंत सर्वंच विठू नामात दंग झाले आहेत. ( Sant Eknath Maharaj Plakhi Yatra Begins Today From Paithan to Pandharpur for Aashadhi Vari )

मोठी बातमी : विठू नामाचा गजर गगनात निनादणार; चोख नियोजनाबरोबर टोल माफीचे निर्देश

पालखी प्रस्थाननिमित्त देहूतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात परंपरेप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शनिवारी 10 जून देहूतून दुपारी दोन वाजता प्रस्थान होणार आहे. भाविकांच्या स्वागतासाठी देहूकर सज्ज झाले आहेत.

दुसरीकडे यावर्षी नाथांच्या पालखीतील दिंड्यातील वारकऱ्यांची संख्या वाडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पालखीचं यंदा 425 वं वर्ष आहे. तर पालखीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी रथाचं सुशोभीकरण तसेच पालखीचा ओटा व परिसराचा विकास झाल्यानंतर प्रथमच येथून पालखी प्रस्थान करणार आहे. त्यामुळे यावेळी वारकऱ्यांचा अनुभव वेगळा असणार आहे.

Gajanan Maharaj : संत गजानन महाराज पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान, शेगाव नगरी दुमदुमली

या पालखीचं प्रस्थान आज शनिवार 10 जून 2023 ला पैठणनगरीमधून सायंकाळी पार पडणार आहे. ही पालखी छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद. आणि सोलापूर या 5 जिल्ह्यांतून जाणार आहे. पंढरपूरला जाताना या पालखीचे 19 मुक्काम होणारप आहेत. तर 28 जूनला आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूरलीा पोहचणार आहे. या पालखीत जवळुपास 90 दिंड्या असणार आहेत. तर 20 हजार पेक्षा जास्त वारकरी पैठण ते पंढरपूर हा 260 किमी पायी प्रवास करणार आहेत.

दरम्यान 11 जून रोजी आळंदी येथून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी प्रस्थान करणार आहे. त्यानिमित्ताने संस्थानची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. माऊलींच्या पालखीसोबत मंदीर समितीचे 300 लोक असणार आहे. रथासोबत माऊलींच्या आरतीचे सामान, वस्त्र, दागिने याची सर्व तयारी झाली आहे.

Tags

follow us