Gajanan Maharaj : संत गजानन महाराज पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान, शेगाव नगरी दुमदुमली
Gajanan Maharaj Palkhi Sohala : गेल्या अनेक दिवसांपासून विदर्भाची पंढरी अशी ओळख असणाऱ्या शेवगावला संत गजानन महाराजांचं मंदिर आहे. हे राज्यातील मोठ देवस्थान आहे. तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला येत असतात. यामध्ये अनेक मानाच्या पालख्या देखील राज्यभरातून पंढरपूर नगरीत दाखल होत असतात. यामध्ये शेगावच्या गजानन महाराजांची पालखी, आळंदीची संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी, देहूची जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी, पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखी यांचा समावेश असतो.
तुम्ही माझ्या मागे ED ला लावले, म्हणून मी तुमच्या मागे MCOCA लावला, खडसेंचा गौप्यस्फोट
त्यामुळे आज बुलढाणा जिल्ह्यातून शेगावातील संत गजानन महाराज पालखीचं आज विठूराच्या पंढरपूराकडे रवाना होणार आहे. या पालखीच्या प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात शेगाव नगरी दुमदुमल्याचं पाहायला मिळालं. अबाल वृद्धांपर्यंत सर्वंच विठू नामात दंग झाले होते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सदाभाऊ खोत यांची ‘वारी शेतकऱ्याची’ पदयात्रा…
डोईवर तुळस घेतलेल्या महिला भविक या दिंडीची शोभा वाढवत होत्या. तर पुरूष वारकऱ्यांनी देखील डोक्यावर शुभ्र टोपी, हाती वैष्णवाची पताका, गळ्यात टाळ, कपाळी अबीर आणि चंदनाचा टिळा असा पोशाख करत विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर असल्याचं दिसून आलं.
Tipu Sultan Sword : टिपू सुलतानच्या तलवारीचा 143 कोटींना लिलाव…
या पालखीचं हे 54 वं वर्ष आहे. तर आज प्रस्थान करणारी ही पालखी 30 दिवसांत पंढरपूरला पोहचते. तब्बल साडेपाचशे किमीचा हा पायी प्रवास या दिंडीकडून केला जातो. यावर्षी 27 जूनला ही पालखी पंढरपूरला पोहचेल. या पालखीसाठी मार्गातील वाहतुकीत बदल करण्यात आला आसू पोलिसंचा मोठा बंदोबस्त देकील तैनात करण्यात येतो.