Tipu Sultan Sword : टिपू सुलतानच्या तलवारीचा 143 कोटींना लिलाव…

Tipu Sultan Sword : टिपू सुलतानच्या तलवारीचा 143 कोटींना लिलाव…

Tipu Sultan Sword : म्हैसूरचा प्रशासक टिपू सुलतानच्या बेडचेंबर तलवारीचा लिलाव लंडनच्या बोनहॅम्सने लिलाव केला आहे. मंगळवारी हा लिलाव झाला असून ही तलवार 143 कोटी रुपयांना विकली गेल्याचेही सांगण्यात आलं आहे. ही तलवार 2004 मध्ये विजय मल्ल्याने खरेदी केली होती. त्यावेळी विजय मल्ल्याने ही तलवार दीड कोटींना खरेदी केली होती.

Video : मैरिज एनिवर्सरीच्या दिवशी संचिनला मिळाले गिफ्ट, लखनौवरील विजयानंतर मानले मुंबई इंडियन्सचे आभार

आता माध्यमांनी या तलवारीच्या पूर्वीच्या मालकांचा शोध घेण्यासाठी यूके लिलाव हाऊस बोनहॅम्सशी संपर्क साधला आहे. मात्र, विक्रेत्यांची ओळख आम्ही उघड करु शकत नसल्याचं बोनहॅम्सच्या समन्वयकाने सांगितलं आहे.

Crime News : स्टोन कटरने प्रेयसीच्या शरीराचे केले तुकडे-तुकडे; पुन्हा आठवलं श्रद्धा हत्याकांड

विजय मल्ल्या यांनी खरेदी केलेली तलवार आणि मंगळवारी लिलाव करण्यात आलेल्या तलवारीवर एकच शिलालेख लिहिलेला होता. ही तलवार मेजर जनरल बैरतुद यांनाही भेट म्हणून देण्यात आली होती, त्यावर शमशीर ए मलिक असे लिहिले होते.

‘हे’ संकट दिल्लीपुरतं मर्यादित नाही; केजरीवालांच्या भेटीनंतर पवारांचा केंद्रावर हल्लाबोल

नुकत्याच विकल्या गेलेल्या टिपू सुलतानच्या तलवारीवरही हा उल्लेख दिसून येतो. तलवारीवर कोरलेला मजकूर 2004 मध्ये मल्ल्याने खरेदी केलेल्या तलवारीसारखाच आहे.

दरम्यान, म्हैसूरचा शासक टिपू सुलतान इंग्रजांविरुद्धच्या युद्धात पराभूत झाल्यानंतर ब्रिटीश सैन्याने टिपू सुलतानच्या बेडचेंबरमधून ही तलवार मिळवली होती. 4 मे 1799 रोजी ब्रिटीशांविरुद्ध टिपू सुलतानचं युद्ध झालं होतं. या तलवारीवर ‘शासकाची तलवार’ असे शब्द कोरलेले आहेत.

या तलवारीवर “शमशीर ए मलिक, याचा अर्थ आहे ही राजाची तलवार. त्याखाली लिहिले आहे की, या अल्लाह! या नासिर! या फतेह! या नासिर! या मुईन! या जहीर! ऐ अल्लाह! ऐ मददगार! ऐ सदाबहार! ऐ ऐडर! ऐ सहायक! ऐ एविडेंट” अशी अक्षरं कोरलेली आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube