शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सदाभाऊ खोत यांची ‘वारी शेतकऱ्याची’ पदयात्रा…

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सदाभाऊ खोत यांची ‘वारी शेतकऱ्याची’ पदयात्रा…

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली ‘वारी शेतकऱ्याची पदयात्रे’चा शुभारंभ करण्यात आला आहे. कराडच्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन करण्यात आला आहे.

Marriage Anniversary : सचिनला मिळाले गिफ्ट, लखनौवरील विजयानंतर मानले मुंबई इंडियन्सचे आभार

यावेळी खोत म्हणाले, वारी शेतकऱ्याची” पदयात्रेला अपेक्षित यश मिळाले आहे, माझ्या मनात प्रचंड भावना भरून आल्या आहेत. बळीराजा हा या राज्यासाठी एक मार्गदर्शक प्रकाश बनून राहिला आहे, जो येथील सर्व नागरिकांना दिलासा देत आहे. परंतु दुर्दैवाने त्यांना त्यांच्या न्याय मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलने करावी लागतात, हे दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले.

या पदयात्रेत रयत क्रांती संघटना, सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र आणि ऊस वाहतूकदार संघटना या संघटनांनी सहभाग घेतला. या पदयात्रेला सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

‘हे’ संकट दिल्लीपुरतं मर्यादित नाही; केजरीवालांच्या भेटीनंतर पवारांचा केंद्रावर हल्लाबोल

शेतीची कामे अर्धवट सोडून सुरू असलेला संघर्ष आता आपला निर्धार दाखवत अखेर चौथ्या दिवशी सातारा येथे दाखल झाला आहे. या पदयात्रेत शेतकऱ्यांनी एकजुटीने एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी न्याय मागण्यासाठी शांततापूर्ण निषेध आंदोलन सुरू केले आहे.

या पदयात्रेत हातात ऊस घेऊन पायी चालत ऊस वाहतूकदारांवर असणाऱ्या अन्यायकारक निर्बंधांचा निषेध नोंदवण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेण्याचे लेखी आश्वासन सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिले आहे.

यावेळी माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रराजे भोसले आदी उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube