Download App

Santosh Deshmukh : मारहाणीचा ‘तो’ व्हिडिओ न्यायालयात सादर; सुनावणीत नेमकं काय घडलं?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh Case) आज बीड जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली.

Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh Case) आज बीड जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत नेमकं काय घडलं याची माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांना दिली. आरोपी वाल्मिक कराडने काही कागदपत्रे मागितली ती दिली. सीलबंद दस्तऐवज आहेत ते सील उघडल्यानंतर देऊ. तसेच संतोष देशमुखांना आरोपींकडून झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा न्यायालयात सादर केला आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

निकम पुढे म्हणाले, 24 तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल त्यानंतर त्याच्यावरती सुनावणी होईल. आज न्यायालयामध्ये जे कागदपत्र आम्ही हजर केले त्यातला प्रत्यक्ष संतोष देशमुख यांना महाराणीचा व्हिडिओ जो की सीआयडीच्या मते तपासाअंतूी असं दिसून आलं होतं की हा व्हिडिओ आरोपींनीच काढलेला होता आणि तो संपूर्ण व्हिडिओ आम्ही न्यायालयात हजर केला आहे.

Santosh Deshmukh Case : बीड हत्येप्रकरणी पंधराशे पानांचं आरोपपत्र दाखल, चार्जशीटमध्ये नेमकं काय?

परंतु न्यायालयाला आम्ही विनंती केली की या व्हिडिओला कुठल्याही प्रकारे बाहेर प्रसिद्धी मिळू नये. यामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून मकोका कायद्याच्या तरतुदी अंतर्गत आम्ही न्यायालयाला अशी विनंती केलेली आहे. यावरती न्यायालयाने सगळ्या आरोपींचं म्हणणं आणि मागितलं आहे त्यांचं म्हणणं ते 24 तारखेला दिल जाईल. त्यानंतर या संदर्भात सुनावणी होईल.

चौथा मुद्दा आजच्या सुनावणीमध्ये वाल्मीक कराडची चल अचल मालमत्ता जप्त करण्यात यावी असा अर्ज दिलेला आहे त्या अर्जावरती अद्यापही वाल्मीकतर्फे खुलासा दाखल करण्यात आलेला नाही. त्याच्यानंतर त्या अर्जावर सुनावणी पुढे रीतसर होईल अशी माहिती अॅड. उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

follow us