छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकाऱ्याने (BDO) लाच मागितल्याचा सरपंचाचा दावा फेटाळला आहे. सरपंचाकडे कुठल्याही पैशांची मागणी केली नसल्याचं स्पष्टीकरण गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांनी दिलं आहे.
संजय राऊतांच्या जीभेला हाडच नाही… गिरीष महाजनांचा खोचक टोला
दरम्यान, बदनामी करण्यासाठी सरपंचाने पैसे उधळण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला असून सदरील व्यक्तीविरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गटविकास अधिकारी यांनी आपल्याकडे शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करण्यासाठी लाच मागितली असल्याचा आरोप गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे यांनी केला.
अजितदादांनी उपटले काँग्रेस नेत्यांचे कान; म्हणाले, गुडघ्याला बाशिंग बांधण्याची गरज नाही..
त्यानंतर साबळे यांनी शेतकऱ्यांकडून १०-१० हजार गोळा केले अन् थेट फुलंब्रीचं पंचायत समिती ऑफिस गाठलं. लाचेची मागणी होताच त्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोरच तब्बल दोन लाख रुपयांची उधळण करीत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला.
रोहित पवारांच्या पराभवासाठी अजित पवारांनी जीवाचे रान केले, नरेश म्हस्केंचा आरोप
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशातच विहीर मंजूर करण्यासाठी अधिकारी हजारोंची लाच मागत आहेत. शेतकऱ्यांनी इतके पैसे कुठून द्यावे, जर त्यांच्याकडे एवढे पैसे असते तर शासनाच्या योजनांसाठी त्यांनी अर्ज कशाला असता? असा सवाल यावेळी साबळे यांनी केला आहे.
हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात बदनामी करण्यासाठीच हा प्रकार सरपंचानी केल्याचा आरोप करत गटविकास अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे.