Mangesh Sable on Maratha Reservation : मराठा समाज माजलाय असं जर कोणी म्हणत असेल, तर त्याची हयगय केली जाणार नाही, या कडक शब्दांत छत्रपती संभाजीनगरमधील गेवराई गावचे सरपंच मंगेश साबळे(Mangesh Sable) यांनी दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाची धग राज्यात कायम असल्याचं दिसून येत आहे. आधी आमरण उपोषण केल्यानंतर आता पुन्हा एकदा मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी त्याविरोधात विधाने केल्याचं पाहायला मिळालं. त्यावरुन साबळे यांनी इशाराच दिला आहे.
आव्हाडांचं जशास तसं उत्तर, मुख्यमंत्र्याचे छोटा राजनच्या सहकाऱ्यासोबतचे फोटोच दाखवले…
मंगेश साबळे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली असता ३० दिवसांत आरक्षण देतो, जीआर काढतो अशी घोषणा केली होती. मात्र ४० दिवस उलटले तरी काही झाले नाही.
Uddhav Thackeray : मोदींचं स्वागत, त्यांनी आता मनोज जरांगेंना भेटावं; उद्धव ठाकरेंनी काय सांगितलं ?
राजकीय घोषणांवर, भाषणांवर आमचा आता विश्वास राहिलेला नाही. आम्हाला ठोस असे उत्तर हवे आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण हवे आहे. मराठा समाज माजलाय असं जर कोणी म्हणत असेल, तर त्याची हयगय केली जाणार नाही.” असा इशारा देखील त्यांनी मराठा समाज आरक्षणास विरोध असणाऱ्यांना दिला आहे.
World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाच्या विजयाने ‘या’ तीन संघांना फायदा; टीम इंडियाचं काय?
मंगेश साबळे यांच्यासह अन्य तिघांनी मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरात सदावर्ते यांच्या वाहनाची तोडफोड केली होती. तसंच ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणाही दिल्या होत्या. राज्यभरात हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले होते.मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांना जामीन मंजूर झाला आहे. मंगेश साबळे, वसंत बनसोडे, राजू सावे अशी तिघांची नावे आहेत. तिघांनाही पाच हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
Deva Movie Release Date: शाहिद कपूरचा ‘देवा’ सिनेमातील फर्स्ट लूक प्रदर्शित
जामीन मंजूर झाल्यानंतर छत्रपती संभाजी नगर मधील गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे, वसंत बनसोडे आणि राजू साठे या तिघांचा डोंबिवलीतील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सत्कार केला. मंगेश साबळे हे नाव महाराष्ट्रात यापूर्वीही चर्चेत आले होते. मंगेश साबळे हे छत्रपती संभाजीनगर येथील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच आहेत. अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यासाठी ते ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी फुलंब्री पंचायत समितीसमोर गटविकास अधिकाऱ्याचा निषेध म्हणून दोन लाख रुपये उधळत अनोखे आंदोलन केले होते. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती.