Download App

धाराशिव जनता सहकारी बँकेत करोडोंचा फ्रॉड! संचालक मंडळाविरूध्द गुन्हा दाखल

Scam of crores of rupees in Dharashiv Janata Sahakari Bank : धाराशिव जनता सहकारी बँकेचे (Dharashiv Janata Cooperative Bank) तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविरुद्ध धाराशिव नगर पोलिस ठाण्यात (Dharashiv Nagar Police Station) 5 कोटी 46 लाख 12 हजार रुपयांचा घोटाळा (Scam) आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळं ठेवीदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, 28 सप्टेंबर 2005 ते 31 मार्च 2008 या कालावधीत धाराशिव जनता सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कट रचून बेकायदेशीररीत्या बॉन्ड खरेदी केले. असे करत त्यांनी नोएडा टोल ब्रिज कंपनी लि. ही कंपनी दिवाळखोरीत असताना त्या कंपनीची पडताळणी केली नाही.

तसेच त्या कंपनीत मुंबईच्या ACE गिल्टास ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड या ब्रोकर कंपनीमार्फत जैन कोऑपरेटिव्ह बँक लि. आणि बंगळुरूची टेक्सटाईल कोऑपरेटिव्ह बँक लि. येथील खात्यातून एकूण 4400 डीप डिस्काउंट बॉण्ड्स खरेदी करण्यासाठी प्रति बॉंड 23000 रुपये जादा भरून बॉण्ड्सची बेकायदेशीररीत्या खरेदी करण्यात केली.

सिद्धरमय्यांनी शब्द पाळला, मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत ‘फाईव्ह गॅरंटी’ मंजूर

यासह त्यांनी आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन करून धाराशिव जनता सहकारी बँकेचे सभासद आणि ठेवीदारांच्या 5 कोटी 46 लाख 12 हजार इतक्या रकमेचा अपहार करून फसवणूक केली.

या कारणामुळे धाराशिव जनता सहकारी बॅकेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरुध्द धाराशिव जनता सहकारी बँकेचे सभासद प्रविण विष्णुपंत धाबेकर यांनी काल धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी कलम 420, 409, 34 अन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष शेजाळ हे करीत आहेत.

Tags

follow us